न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाही !

 

* आरपीआय आठवले श्रमिक ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश सचिव तुषार तानाजी कांबळे यांची प्रतिक्रिया 

मुंबई / प्रतिनिधी :- स्मिता लक्ष्मण शेवाळे व त्यांची मुलगी संस्कृती लक्ष्मण शेवाळे यांना न्याय दिल्याशिवाय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्ष शांत बसणार नाही, अशी प्रतिक्रिया आरपीआय आठवले श्रमिक ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश सचिव तुषार तानाजी कांबळे यांनी व्यक्त केली. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, स्मिता लक्ष्मण शेवाळे व त्यांची मुलगी संस्कृती लक्ष्मण शेवाळे यांचा गट नं. १९८३ असून मौजे लोणी काळभोर, तालुका हवेली, जि. पुणे येथील त्या रहिवासी आहेत. यांनी तहसील कार्यालय व मंडळ अधिकारी यांच्याकडे २५ ऑक्टोबर २०२४ रोजी हरकत अर्ज भरून दिला होता. तरी सुद्धा तहसीलदार, तलाठी व मंडळ अधिकारी यांनी चुकीच्या पध्दतीने नोंदी केल्या आहेत. त्यांना योग्य तो न्याय मिळण्याबाबत तसेच संबंधित शासकीय अधिकारी तलाठी व मंडळ अधिकारी लोणी काळभोर यांची विभागीय चौकशी व्हावी, तसेच स्मिता लक्ष्मण शेवाळे, संस्कृती लक्ष्मण शेवाळे यांना त्यांच्या वडीलोपार्जित असलेल्या जमीनीमधून त्यांना वगळून टाकण्यात आलेले आहे. यांनी हरकत अर्ज भरून सुध्दा त्यांची ७/१२ वर नोंद अद्यापपर्यंत घेतलेल्या नाहीत. त्यांचे सासरे हरीशचंद्र नारायण शेवाळे व त्यांचे पती लक्ष्मण हरीशचंद्र शेवाळे यांनी वारसामधून स्मिता शेवाळे व त्यांची मुलगी संस्कृती लक्ष्मण शेवाळे चुकीच्या पध्दतीने कुलमुखत्यार पत्र दस्त क्रमांक २२२७६/२०२४ करून दिले होते. व त्यांनी त्यांच्या वारसांनी स्मिता शेवाळे व त्यांच्या मुलीला वगळून त्यांच्या न कळत तसेच शेवाळे व त्यांच्या मुलगी कु. संस्कृती लक्ष्मण शेवाळे यांची कोणतीही विचारपूस न करता परस्पर त्यांच्या वडीलोपार्जित असलेली जमीन दि. १४ ऑक्टोंबर २०२४ रोजी खरेदीखत स्वरूपाने दस्त क्र. २१६९५/२०२४ चुकीच्या पध्दतीने हवेली क्र. १२ या ठिकाणी केलेले  आहे. 

तरी यांची सर्वस्वी जबाबदारी राहाय्यक दुय्यम निबंधक हवेली क्र.३ आणि हवेली क्र. १२ यांची असून या सर्वांना तत्काळ बडतर्फ करून कारवाई करण्यात यावी. तसेच स्मिता शेवाळे यांचे सासरे, पती व त्यांचे वारस यांच्यावरही कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच पुणे जिल्ह्यातील स्मिता लक्ष्मण शेवाळे यांना न्याय मिळवून देण्याकरीता आरपीआय आठवले श्रमिक ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश सचिव तुषार तानाजी कांबळे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा केली. याविषयी मंत्री बावनकुळे यांनी क्षणाचाही विलंब न लावता कार्रवाई करण्याचे आदेश दिले. तसेच पुणे विभागीय आयुक्त यांनी स्वतः लक्ष घालून ७ दिवसाच्या आत अहवाल मागविला.

Post a Comment

Previous Post Next Post