बारामती / अक्षय कांबळे :- नविन सर्किट हाऊस पुणे येथे स्व. रामभाऊ बराटे स्मृतीनिमित्त आयोजित आदर्श जिल्हा परिषद पदाधिकारी व अध्यक्ष पुरस्कार उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते विश्वासराव देवकाते यांना देण्यात आला.
यावेळी विश्वासराव देवकाते म्हणाले की, पुरस्काराबद्दल मनस्वी आंनद तर झालाच परंतु हा सन्मान हा अधिक जबाबदारी देणारा व सामाजिक कार्यात बळ देणारा ठरेल. पुरस्कार वितरण करतेवेळी जय हिंद सेना महाराष्ट्र अध्यक्ष सनी देवकाते पाटील, सोनू बुरुंगले, अक्षय कांबळे, रोहित देवकाते, विश्वराज वाघमोडे आदी उपस्थित होते.
