* खुलेआम सुरु असलेल्या अवैध उत्खनन व भरावावर कारवाई करण्यास महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष ?
कर्जत / प्रतिनिधी :- कर्जत तालुका तिसर्या मुंबईच्या दिशेने वाटचाल करीत असून हॉटेल, फार्म हाऊससह गृह प्रकल्प, रस्त्याचे काँक्रिटीकरण यामुळे बांधकाम साहित्य पुरविणारे व्यवसाय तेजीत आहेत. या व्यवसायावर ठराविक वर्गांची मक्तेदारी असून राजकीय हितसंबध वापरून अनिर्बंध वाहतूक सुरू असते. गौण खनिज वाहतूक करताना रॉयल्टी भरणे आवश्यक असताना देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शिवाय प्रमाणापेक्षा जास्त माल डंपरमध्ये भरून वाहतूक होत आहे. अशा पद्धतीने होणार्या धोकादायक वाहतुकीला महसूल विभागाचा आशीर्वाद असल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवस आधी कर्जत तालुक्यात येणारे बारणे गावाच्या हद्दीत भला मोठा मुरूम मातीचा भराव करण्यात आला आहे.मात्र हे भराव करण्यासाठी रॉयलटी भरण्यात आली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
कर्जत -खालापूर तालुक्यात गेल्या काही वर्षां पासून अवैद्य उत्खनन भराववर मोठ्या जोमाने सुरु आहे. नामशून्य रॉयलटी भरून हाजारो ब्रासचे सरास पणे महसूल प्रशासनाच्या डोळ्यादेखत उत्खनन भराव केले जात आहेत. १०० ब्रासची रॉयलटी भरण्यासाठी अंदाजे 80 हाजर ते 90 हजार रुपये भरावे लागतात. रॉयलटी भरण्या आधी महसूल प्रशासनाला रीतसर अर्ज करून तलाठी मंडल अधिकाऱ्यांचा समक्ष किती ब्रास चे काम आहे.. माती कुठून काढणार आहेत व कुठे टाकणार आहेत..या जाग्याच्या सातबारा, नकाशा, आजूबाजूला लगत असणाऱ्या शेतकऱ्यांची सहमती घेऊन पंचनामा करून सर्व नियमांचे पालन करून महसूल विभागाची पूर्वपरवानगी नुसार उत्खनन भराववर करण्याची परवानगी दिली जाते.मात्र गेल्या काही वर्षां पासून या दोन्ही तालुक्यात नाम शून्य रॉयलची परवानगी पेक्षा जास्त मुरूमाचे उत्खनन मुरूम माफीयांकडून होत आहे. परवानगी पेक्षा जास्त ब्रासचे उत्खनन झाले असताना स्थानिक महसूल विभाग या मुरूम उत्खननाची मोजणी इटीएस मशीनद्वारे किंवा समक्ष मोजमाप घेण्याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थानांमधून होत आहे. कर्जत -खालापूर तालुक्यातील निवडणूक काळात भ्रमसाठ अवैध उत्खनन करून कोठ्यावधी रुपयाचे महसूल बुडवणाऱ्यां माफी्यांवर तेसच बारणे गावाच्या हद्दीत झालेल्या उत्खनन भरावाची सखोल चौकशी करून प्रांत अधिकारी कार्यवाही करणार का?की सर्वसामान्य जनता जनार्दन व पत्रकारांनी आंदोलन, उपोषण, आत्मदहन जलसमाधी, घेतल्यावर, कार्यवाही करणार?असा सवाल कर्जत - खालापूर मधील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.
