तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत केंद्र तोंडली नारंगी अव्वल

खालापूर / प्रतिनिधी :- खालापूर तालुक्यांतर्गत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा खालापूर आयोजित शिक्षक वर्धापनदिनानिमित्त सालाबादाप्रमाणे कलोते मोकाशी येथे शिक्षकांसाठी क्रिकेट, बुद्धिबळ  व  महिलांसाठी खेळ पैठणीचा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये उत्तम नियोजन असल्याने स्पर्धा अतिशय रंगतदार पार पडल्या, त्यासाठी संघटनेचे मार्गदर्शक दिलीप देशमुख, जिल्हा नेते उमेश विचारे, तालुकाध्यक्ष संदीप जाधव सर व संघटनेचे  सर्व पदाधिकाऱ्यांनी खूप परिश्रम घेऊन सदर स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. 

या स्पर्धेमध्ये खालापूर तालुक्यातील केंद्र तोंडली, नारंगी केंद्रातील शिक्षकांनी आपल्या क्रीडा क्षेत्रातील, बुद्धिबळातील व खेळ पैठणीचा या स्पर्धेतील दबदबा कायम ठेवला आणि विविध बक्षिसांची कमाई केली केली. या स्पर्धेमध्ये खेळ पैठणीचा यामध्ये नीता वैशपायन यांनी प्रथम क्रमांक मिळविला तर संगीत खुर्चीमध्ये वैशाली पाटील यांनी चतुर्थ क्रमांक प्राप्त केला. राजाभाऊ करपे यांनी बुद्धिबळ स्पर्धेत तालुका अंतर्गत प्रथम क्रमांक, भागिनाथ पोटे यांनी तृतीय क्रमांक मिळविला. क्रिकेट केंद्र तोंडली नारंगी संघनायक परशुराम तासतोडे व संघ यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.

संघातील खेळाडू भागिनाथ पोटे, भरत मोहिते, संतोष निघोट, नरेंद्र भिकावले, अमोल पाटील, सुदर्शन आंधळे, नारायण बोडेकर, रवी घोगरे, राजाभाऊ करपे, अमोल म्हस्के  या सर्व खेळाडूंनी उत्तम कामगिरी करून विजयश्री खेचून आणली. तर प्रथम क्रमांक वावरले व तृतीय क्रमांक सारंग केंद्राला मिळाला. या क्रिकेट स्पर्धेत भागिनाथ पोटे उत्कृष्ट फलंदाज अंतिम सामन्यातील सामनावीर ठरले. अंतिम सामना भागिनाथ पोटे यांच्या तडाकेबाज फलंदाजीमुळे व गोलंदाजीमुळे उत्कंठावर्धक ठरला. स्पर्धेसाठी केंद्रातील केंद्रप्रमुख संतोष पाटील, दीपक खाडे, संतोष निघोट, शिल्पा पाटील, शुभांगी मोरे आदींनी वेळोवेळी केंद्रातील सर्व शिक्षकांना प्रोत्साहन व मार्गदर्शन केले. त्यामुळे सदर स्पर्धेमध्ये केंद्र तोंडली नारंगीच्या शिक्षकांचे या स्पर्धेत वर्चस्व राहिले. 

Post a Comment

Previous Post Next Post