इंदापूर / प्रतिनिधी :- ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित वालचंद विद्यालय जुनियर कॉलेज कळंब येथे 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे युवा संचालक प्रतापसिंह कदम, कार्यक्रमाच्या अध्यक्षा रेडेकर मॅडम, प्रमुख पाहुणे जिल्हा परिषदेच्या सहशिक्षिका येवले मॅडम, वालचंद विद्यालयाचे प्राचार्य सुरेश अर्जुन सर, पर्यवेक्षक आळंद सर, जूनियर विभाग प्रमुख सावंत सर, सांस्कृतिक विभाग प्रमुख गायकवाड मॅडम, विद्यालयातील सर्व शिक्षक स्टाफ, माध्यमिक ज्युनिअरचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रस्ताविक जुनिअर विभागाचे प्राध्यापक पवार सर यांनी केले. त्यांनी जयंत्या व पुण्यतिथी आपण का साजरी करीत आहोत, त्याचे उद्दिष्ट हे विद्यार्थ्यांना पटवून देऊन सावित्रीबाई यांच्याविषयी माहिती दिली. तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या येवले मॅडम यांनी सावित्रीबाईंच्या जीवनातील काही प्रसंग सांगून आजच्या विद्यार्थ्यांना या महापुरुषांच्या विषयीचे महत्व पटवून दिले. शेवटी कार्यक्रमाच्या अध्यक्षा रेडेकर मॅडम यांनी सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबाबतची सर्व इत्थंभूत माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्यांनी सावित्रीबाईंच्या जन्मापासून त्यांचे सर्व कारकीर्द त्यामधील पुण्यामधील सुरू केलेली मुलींसाठीची पहिली शाळा पहिल्या मुख्याध्यापिका ते 1897 पर्यंतच्या प्लेगच्या साथी पर्यंतचा सर्व प्रवास त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मांडला. तसेच 14 विद्यार्थ्यांनी आपली मनोगत व्यक्त केले. इयत्ता पाचवी ते इयत्ता बारावीपर्यंतच्या विद्यार्थिनींनी आपला सहभाग नोंदविला व कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.
