* दै. कोकण प्रदेश न्यूज संपादक फिरोज पिंजारी, रायगड टुडे संपादक शेखर परब, संतोष गोतारणे सन्मानित
खोपोली / मानसी कांबळे :- हेल्पिंग हॅन्ड क्लब आणि आमदार महेंद्रशेठ थोरवे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय नगरसेवक अमोल जाधव यांच्या स्मरणार्थ खोपोली युथ फेस्टिवल 2025 चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवामध्ये विविध क्षेत्रात खोपोली शहराचे नाव उज्ज्वल करणाऱ्या मान्यवरांचा देखील आमदार महेंद्र थोरवे, शिवसेना संपर्क प्रमुख संदीप पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. पत्रकारीता क्षेत्रातील मान्यवरांचा देखील सत्कार करण्यात आला. यात दै. कोकण प्रदेश न्यूजचे संपादक तथा न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन संस्थापक अध्यक्ष फिरोज पिंजारी, रायगड टुडेचे संपादक शेखर परब, पत्रकार संतोष गोतारणे यांचा समावेश होता.
पत्रकार फिरोज पिंजारी दैनिक कोकण प्रदेश न्यूज, दैनिक कोकण प्रजा, कोकण प्रवाह, इंटरपोल वेब पोर्टल व केपी न्यूज चैनलच्या माध्यमातून मागील 10 वर्षापासून खोपोली शहर व परिसरात पत्रकारिता करीत आहेत. तर दै. पुण्यनगरी, दै. सकाळ, दै. देशोन्नती, दै. कर्नाळा, न्यूज 24, ईटीव्ही मराठी, एएन नेटवर्कच्या माध्यमातून ते 17 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. त्याचप्रमाणे विविध पत्रकार संघटनाच्या माध्यमातून ते पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढत आहेत. न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून पत्रकार खलील सुर्वे, सुधीर गोविंद माने, डॉं. शरीफ बागवान, अनिल पवार, अश्वनी कुमार, मानसी कांबळे, प्रविण कोळआपटे आदी पत्रकारांच्या सहकार्याने देशभरातील पत्रकारांना एकत्रित करीत आहेत. न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन सध्या महाराष्ट्रासह 16 राज्यांमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत खोपोली युथ फेस्टिवलमध्ये पत्रकार फिरोज पिंजारी यांचा शिवसेना कर्जत विधानसभा संपर्क प्रमुख पंकज पाटील, शिवसेना नेते अनिल मिंडे, हरिश काळे, आयोजक मुकेश रुपवते यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉं. सुनिल गोटीराम पाटील, माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, जेष्ठ नगरसेवक मोहन औसरमल, युवा सेना शहर प्रमुख संतोष मालकर, उपशहर प्रमुख दिनेश थोरवे, युवा सेना संपर्क प्रमुख सिद्धांत शेलार, माजी नगरसेवक किशोर पानसरे, शिवसेना उपशहर प्रमुख संतोष महाडिक, सामाजिक कार्यकर्ते नदीम खान, अमित फाळे, माजी नगरसेविका वनिता काळे, शहर प्रमुख संदीप पाटील, महिला आघाडी शहर प्रमुख प्रिया जाधव, जेबुन्निसा शेख, हमीद शेख, सचिन गुरसळ तसेच शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी महायुतीचे पदाधिकारी, महिला आघाडीचे पदाधिकारी, उद्योजक, समाजसेवक, पत्रकार आणि विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित होते.
