सहजसेवा फाउंडेशनच्या वतीने खालापूर पंचायत समिती कार्यालय येथे पुस्तक लायब्ररीचा शुभारंभ

 

* सहजसेवेची खालापूर तालुक्यातील चौथी लायब्ररी 

खालापूर / प्रतिनिधी :- सहजसेवा फाउंडेशन समाजासाठी नाना विविध सातत्यपूर्ण उपक्रम राबवित असते. समाजाची गरज ओळखुन सामाजिक उपक्रम करणे ही संस्थेची ओळख आहे. खालापूर तालुक्यात पंचायत समिती कार्यालय येथे शासकीय कामासाठी समाजातील विविध स्तर येत असतात. कामानिमित्त काही वेळ थांबणाऱ्या नागरिकांचा वेळ वाचनात सार्थक ठरावा यासाठी सहजसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून पंचायत समिती कार्यालयात विविध प्रकारची पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाचा शुक्रवार, 24 जानेवारी 2025 रोजी खालापूर तालुक्याचे गटविकास अधिकारी संदीप कराड यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. खालापूर तालुक्याचे गटविकास अधिकारी संदीप कराड यांनी शुभारंभाचा श्रीफळ वाढविला. यावेळी पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वीेतेसाठी सहजसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉं. शेखर जांभळे, उपाध्यक्षा इशिका शेलार, खजिनदार संतोष गायकर, सचिव अखिलेश पाटील, सहखजिनदार बनिता सहा, महिला संघटक निलम पाटील, जनसंपर्क प्रमुख जयश्री कुलकर्णी, मार्गदर्शक नरेंद्र हर्डीकर, खालापूर तालुका प्रमुख मोहन केदार, सुरज पाटील, सागरिका जांभळे यांनी परिश्रम घेतले. पत्रकार विकी भालेराव यांनी या उपक्रमाचे सूत्रसंचालन केले.

सहज लायब्ररीचा पंचायत समिती कार्यालय येथे येणाऱ्या जनतेसाठी नक्कीच उपयोग होईल आणि कार्यालयातील वातावरण वैचारिक राहण्यास मदत होईल. जिल्हाधिकारी यांच्यामार्फत येणारे मासिक सुध्दा यात समाविष्ट होवून ज्ञानात नक्कीच भर पडेल, असा आशावाद खालापूरचे गटविकास अधिकारी संदीप कराड यांनी व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post