* 17 फेब्रुवारी 2025 पर्यंत प्रगती न दिसल्यास उपोषण करणारच
* विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची भेट घेवून निवेदन देणार
* 15 दिवसांत दिल्लीसह महाराष्ट्रातील प्रमुख कार्यालयात पत्रव्यवहार करणार
कर्जत / प्रतिनिधी :- पंतप्रधान मातृ वंदन योजनेतील लाभार्थी महिलांवर मोठा अन्याय होत असल्याने पत्रकार राजेंद्र जाधव यांनी 26 जानेवारी रोजी उपोषण करण्याचा इशारा दिला होता. परंतु कर्जत तहसिलदार धनंजय जाधव यांनी हस्तक्षेप करीत व गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी आश्वासन दिल्याने पत्रकार राजेंद्र जाधव यांनी 26 जानेवारी रोजी करण्यात येणारे उपोषण तात्पुरते मागे घेतले आहे. पण लढाई संपलेली नाही...पंतप्रधान मातृ वंदन योजनेचा लढा सुरूच राहणार, असे सांगत अखिल भारत जर्नालिस्ट फेडरेशन (एबीजेएफ) रायगड जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव म्हणाले की, आम्ही मिटींगमध्ये ठरल्याप्रमाणे 17 फेब्रुवारी 2025 पर्यंत कार्रवाईची वाट पाहू पण 17 फेब्रुवारी पर्यंत आरोग्य अधिकारी डॉं. नितीन गुरव जर वेळकाढूपणा करीत असल्याचे दिसून आले तर 18 फेब्रुवारीपासून आम्ही आंदोलन सुरू करू, असा इशारा जाधव यांनी दिला.
मातृ वंदन योजनेत घोळ झाला आहे. महिलांच्या आलेल्या अर्जांची आकडेवारी वारंवार बदलत आहे. मागील 4-5 वर्षात ऑपरेटर प्रविण भोईर व त्यांचे सहकारी अनभिषिक्त सम्राट म्हणून काम करीत होते. अजूनही कर्जत पंचायत समिती आरोग्य विभागात भोईर यांची दहशत कायम असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच राजीनामा देवून 20 दिवस उलटले तरी राजीनामा मंजूर होत नाही. आम्ही करीत असलेल्या अर्जांची...बैठकीत होत असलेल्या चर्चांची...मागण्यांची व कर्जत पंचायत समितीत होत असलेल्या हालचालीची इंत्भूत माहिती ऑपरेटर प्रविण भोईर पर्यंत पोहचत असल्याचे दिसून येत आहे. आरोग्य विभागातील अनेक जण प्रवीण भोईरच्या दहशतीखाली वावरत असल्याचे दिसून येत आहे. ऐवढेच नव्हे तर एका पत्रकार मित्राने आंदोलक राजेंद्र शिवाजी जाधव यांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, आज आरोग्य विभागातील कर्मचारी ऑपरेटर प्रविण भोईर याच्यावर आरोप करीत असतील, पण तो समोर आल्यावर, त्यांच्या समक्ष बोलण्याची कुणाचीच हिंम्मत होणार नाही. ऐवढेच नव्हे तर तुमचे आंदोलन ठिक आहे, पण डॉं. नितीन गुरव, ऑपरेटर प्रविण भोईर यांच्या विरोधात जाणे महाग पडेल, जे करायचे ते सांभाळून करा, असा सल्ला अनेक जण देत असल्याने अशी कोणती अदृश्य शक्ती... पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयापासून तर स्थानिक लोकप्रतिनिधी पर्यंत कौन-कौन डॉं. नितीन गुरव, ऑपरेटर प्रविण भोईर व इतर कर्मचारी यांना वाचविण्यासाठी आटापिटा करीत आहे, याचा शोध घेतला जावा, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, पत्रकार राजेंद्र जाधव म्हणाले की, मी लढत राहिल. डॉं. नितीन गुरव, ऑपरेटर प्रविण भोईर व त्यांचे सहकारी यांनी माझा जीव घेतला तरी चालेल पण पंतप्रधान मातृ वंदन योजनेतील लाभार्थी महिलांना लाभ मिळत नाही. दोषींवर कार्रवाई होत नाही तोपर्यंत मी लढतच राहणार आणि त्यासाठी मी पंतप्रधान कार्यालय दिल्ली, केंद्रीय आरोग्य विभाग व महाराष्ट्र सरकार आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह महाराष्ट्रातील प्रमुख कार्यालयात पत्रव्यवहार करणार आहे, असेही पत्रकार राजेंद्र जाधव यांनी स्पष्ट केले.