कळव्यात आ. जितेंद्र आव्हाड यांच्याहस्ते डॉं. चांदे यांच्या क्लिनिकचे उद्घाटन

 


ठाणे / अमित जाधव :- ठाणे शहरातील कळवा येथे आमदार डॉं. जितेंद्र आव्हाड व मा. नगरसेवक मिलींद पाटील, मा.  उपमहापौर मनोहर साळवी, समाजसेवक सोनी यांच्या उपस्थितीत डॉं. चांदे फिजिओथेरपी क्लिनिकचे उद्घाटन करण्यात आले. आ. जितेंद्र आव्हाड व मान्यवरांचे समाजसेवक विकास भोर, ओझन व्हॅलीचे अध्यक्ष सुनील पवार आणि सर्व सभासद यांनी सत्कार करीत अभिनंदन केले. डॉं. चांदे क्लिनिकमध्ये प्रशिक्षित तज्ज्ञ डॉक्टर व फिजीओथेरपीसाठी उपयुक्त संसाधने उपलब्ध आहेत. 

फिजीकल थेरेपीमध्ये भौतिक साधनांचा (ऊर्जा, बर्फ, उष्णता, vibration आदी) वापर करून तसेच वेगवेगळे व्यायामाचे प्रकार, वेगवेगळे तंत्रज्ञान तसेच इलेक्ट्रिकल साधनांचा वापर करून उपचार केले जातात व रुग्णांना उपचार दिले जातात. कळवा व जवळच्या सर्वच नागरिकांनी एकदा अवश्य भेट द्यावी, असे आवाहन डॉं. चांदे यांनी केले. समाजसेवक विकास भोर यांनी देखील सर्वांना आवाहन करीत कळवावासि्यांनी आपल्या हक्काच्या डॉं. चांदे क्लिनिकमध्ये उपचारासाठी यावे, असे आवाहन केले.

Post a Comment

Previous Post Next Post