कर्जत / नरेश जाधव :- 25 जानेवारी 2025 रोजी उरण प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या चेअरमन पदाची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंदार पंढरीनाथ रसाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उरण पतपेढीचे कार्यक्षेत्र संपूर्ण रायगड जिल्हा असून जिल्ह्यातील अग्रगण्य अशी पतपेढी समजली जाते. सन 2022 मध्ये पार पडलेल्या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शिक्षक मित्रचे संपूर्ण पॅनल (15 संचालक) निवडून आले होते. या पॅनलचे प्रमुख सुभाष हिरा भोपी आणि जयदास घरत यांनी हे पॅनल निवडून आणले होते.
पॅनल प्रमुख तसेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघांचे जिल्हाध्यक्ष सुभाष भोपी आणि नेते जयदास घरत यांनी चेअरमन पदाची संधी ही कर्जत तालुक्याला दिली. पतपेढीच्या 50 वर्षाच्या इतिहासात कर्जत तालुक्यातून पहिला चेअरमन होण्याचा मान हा मंदार रसाळ यांना मिळाला आहे. आजच्या चेअरमनच्या निवडीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाष भोपी, जिल्हा उपाध्यक्ष नेते जयदास घरत, कोषाध्यक्ष प्रकाश काथारा, सचिव विकास पाटील, खजिनदार राजेंद्र मोकल, प्रसिद्धी प्रमुख संजय साळवे, पद्माकर पाटील, जुईकर सर, पनवेल तालुका अध्यक्ष प्रभाकर घरत, उरण तालुका अध्यक्ष महेंद्र गावंड, कर्जत तालुका अध्यक्ष अजय केंद्रे, खारघर केंद्र प्रमुख संजय पाटील, मनीषा पाटील तसेच शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष विजय येलवे, शिक्षक समिती तळा तालुका अध्यक्ष सुनील बैकर, शिक्षक सेना कोकण विभाग प्रमुख कौशिक ठाकूर, जुनी पेन्शन संघटना पनवेल अध्यक्ष राजश्री मोकल, जितेंद्र धावडे, प्रशांत कराळे, अमित कंधारे, प्रमोद फकिरे यांसह संपूर्ण संचालक मंडळ उपस्थित होते. निवड झाल्यावर संपूर्ण रायगड जिल्ह्यातून मंदार रसाळ यांचे अभिनंदन होत आहे.
