* पत्रकारांचा सन्मान, वकृत्व स्पर्धा आणि साप्ताहिक खालापूर वार्ताच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन
खालापूर / मानसी कांबळे :- मराठी पत्रकार दिनाचे औचित्य साधत साप्ताहीक खालापूर वार्ता व न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 6 जानेवारी रोजी पत्रकारांचा सन्मान, वकृत्व स्पर्धा आणि साप्ताहिक खालापूर वार्ताच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा खालापूर येथील आदिवासी भवन येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉं. सुनील गोटीराम पाटील होते.
सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉं. बाबासाहेब आंबेडकर, आद्य संपादक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर मराठी पत्रकार दिन का साजरा केला जातो? पत्रकार कसा असावा? आचार्य बाळशास्त्री जांभेकर कौन होते? या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात खालापूर येथील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन आपले परखड विचार मांडले. या विद्यार्थ्यांमधून चार क्रमांक काढण्यात आले. प्रथम पारितोषिक रु. 1000/- रोख आणि प्रमाणपत्र, द्वितीय पारितोषिक रु. 700/- रोख आणि प्रमाणपत्र, तृतीय क्रमांक रू. 500/- रोख आणि प्रमाणपत्र, चतुर्थ क्रमांक रू. 300/- रोख आणि प्रमाणपत्र असे बक्षिस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
दरम्यान, यावेळी न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष खलील सुर्वे यांनी साप्ताहीक खालापूर वार्ताचे संपादक सुधीर माने यांची न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन राष्ट्रीय कोषाध्यक्ष तथा कोकण प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती केली. तसेच दैनिक अक्षराज व सारथी महाराष्ट्राचा वेब पोर्टलच्या खालापूर प्रतिनिधी मानसी गणेश कांबळे यांची राष्ट्रीय महिला महासचिव, पत्रकार सुधीर देशमुख यांची खालापूर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या निवडीबद्दल उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या सर्वांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे याप्रसंगी साप्ताहीक खालापूर वार्ताच्या दिनदर्शिकेचे अनावरण करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते माजी नगराध्यक्ष सुनिल गोटिराम पाटील, खालापूर नगरपंचायत नगराध्यक्षा रोशना मोडवे, खालापूर नगरपंचायत गटनेते किशोर पवार, न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन संस्थापक अध्यक्ष फिरोज पिंजारी, राष्ट्रीय अध्यक्ष खलील सुर्वे, खालापूर पोलिस उपनिरीक्षक (DYSP) सुधीर शिंदे, बिरसा बिग्रेड आदिवासी संघ खालापूर अध्यक्षा हिरा गोपाळ पवार, भाजपा खालापूर शहर प्रमुख दीपक जगताप, बिरसा बिग्रेड आदिवासी संघ रायगड कार्याध्यक्ष अनंता रघुनाथ वाघमारे, शिवसेना शाखा प्रमुख निखिल मिसाल, सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ पारठे, पांडुरंग भगत, दिलीप डाके, माजी मुख्याध्यापक हेमचंद्र पारंगे, पत्रकार मनोज कळमकर, संजय पाटील, खालापूर ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉं. रविंद्र जाधव, उपाध्यक्ष जतीन मोरे, सुभाष वैशम पायन आदी उपस्थित होते.

