पत्रकार दिनानिमित्त सुधीर देशमुख यांचा विशेष सन्मान

 


* माहिती अधिकार व पत्रकारिता क्षेत्रात विशेष उल्लेखनिय कामगिरी

खालापूर / विशेष प्रतिनिधी :- साप्ताहिक खालापूर वार्ता व न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने 6 जानेवारी 2025 रोजी खालापूर आदिवासी भवन येथे मराठी पत्रकार क्षेत्रात अद्वितीय कामगिरी करणारे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना पत्रकार दिनानिमित्त अभिवादन सोहळा संपन्न झाला.

या कार्यक्रमात पत्रकार सुधीर देशमुख यांना माहिती अधिकार क्षेत्रात व पत्रकारिता क्षेत्रात विशेष कामगिरी केल्याबद्दल खोपोली नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष डॉं. सुनील गोटीराम पाटील व पोलिस उपनिरीक्षक (डिवायएसपी) सुधीर शिंदे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. मागील वर्षभरापासून तालुक्यात व जिल्ह्यात असे कोणतेही शासकीय कार्यालय नाही, ज्यात सुधीर देशमुख यांनी माहिती अधिकार कायद्याखाली अर्ज केला नसेल. रायगड जिल्हा अधिकारी कार्यालय, रायगड जिल्हा परिषद कार्यालय, रायगड जिल्हा कोषागार कार्यालय, रायगड जिल्हा निबंधक कार्यालय, रायगड जिल्हा महसूल व वन विभाग, खालापूर तालुका तहसील कार्यालय, खालापूर तालुका भूमी अभिलेख कार्यालय, तालुका दुय्यम निबंधक कार्यालय, तालुका पंचायत समिती, खालापूर नगर पंचायत, तालुका बांधकाम विभाग कार्यालय, तालुका वन विभाग कार्यालय,  नगर पालिका, नगर परिषद कार्यालय, कर्जत प्रातांधिकारी कार्यालय, मंत्रालय,अशा विविध शासकीय कार्यालयात विविध विषयांवर माहिती अधिकार अर्ज करून व त्याचा पाठपुरावा करून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम तसेच माहिती अधिकार कायदा व पत्रकारितेतून जनतेला न्याय मिळून देण्याचे काम त्यांनी केले आहे. पत्रकार सुधीर देशमुख यांच्या या उल्लेखनीय कामगिरीचा प्रत्येक शासकीय कार्यालयात भीतीयुक्त आदर निर्माण झाला आहे. माहिती अधिकार कायदा कोकण आयुक्त यांनी देखील त्यांच्या कामाची प्रशंसा केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post