कर्जतमध्ये पत्रकारांसाठी सुसज्ज पत्रकार भवन!

 


* पत्रकार भवन संदर्भात कर्जत प्रेस क्लबच्यावतीने आ. महेंद्र थोरवे यांना निवेदन 

कर्जत / विलास श्रीखंडे :- कर्जत विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत आ. महेंद्र थोरवे यांनी दुसऱ्यांदा विजय संपादन केल्यानंतर कर्जत प्रेस क्लबच्या सर्व सदस्यांनी आपले लोकप्रतिनिधी म्हणून आ. महेंद्र थोरवे यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना या मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी भरभरून शुभेच्छा देत कर्जत मतदार संघातील सर्व पत्रकार बांधवांसाठी एक सुसज्ज असे पत्रकार भवन आपल्या कार्यकाळात उभारण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन दिले.    

पोसरी शिवतीर्थ या ठिकाणी आ. महेंद्र थोरवे यांना शुभेच्छा देण्यासाठी रायगड प्रेस क्लबचे उपाध्यक्ष संजय मोहिते, खजिनदार दर्वेश पालकर, कर्जत प्रेस क्लबचे अध्यक्ष राहुल देशमुख, विलास श्रीखंडे, दिपक पाटील, अजय गायकवाड, गणेश पवार, कांता हाबळे, ज्ञानेश्वर बागडे, मल्हार पवार, विपुल माळी, मोतीराम पादीर, अनिल गवळे आदी उपस्थित होते. याप्रसंगी आ. महेंद्र थोरवे यांनी पत्रकारांशी दिलखुलास संवाद साधताना सांगितले की, तुमची एक पत्रकारांची नुसती संघटना नसून सामाजिक क्षेत्रात झोकून काम करणारी सामाजिक चळवळीतील ही पत्रकारांची सामाजिक संघटना आहे. त्यामुळे माझ्या दुसऱ्या विकास पर्वात सुद्धा मतदार संघातील सर्व पत्रकार बांधवांचे योगदान महत्त्वाचे ठरणार असून यापुढे ही आपला सर्वांचा सहयोग सतत या मतदार सघांच्या सर्वांगीण विकासासाठी मिळाला पाहिजे असे आवाहन आ. थोरवे यांनी केले.       

दरम्यान, मराठी पत्रकार दिनानिमित्त कर्जत येथील बाळासाहेब भवनमध्ये आ. महेंद्र थोरवे यांच्या वतीने कर्जत-खालापूर मतदार संघातील पत्रकारांचा विशेष सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी सुद्धा पुढील काळात कर्जत आणि खालापूर तालुक्यांमध्ये लवकरच पत्रकार भवन उभे करण्याचा निर्णय आमचा असल्याचे आ. महेंद्र थोरवे यांनी सांगितले. त्यामुळे भविष्यात पत्रकार भवन उभे राहिल्यानंतर पत्रकारांना त्यांच्या कार्यक्रमांसाठी योग्य जागा मिळेल. तसेच सर्व राजकीय पक्ष आणि संघटना यांना सर्व प्रकारच्या पत्रकार परिषद एकाच ठिकाणी आयोजित करणे सोपे होईल.

स्वर्गीय जेष्ठ पत्रकार नाना कुलकर्णी, दत्ता देशमुख, दादा दांडेकर, संतोष पवार, धर्मानंद गायकवाड आणि कर्जत प्रेस क्लबसह अन्य पत्रकार संघटनांमधील सर्वच पत्रकार मित्रांनी या मतदार संघाच्या जडणघडणीत आजपर्यंत मोठ योगदान दिलेले आहे, त्यामुळे या मतदार संघाची विकासात्मक घौडदौड पाहता विद्यमान कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे या मतदार संघातील पत्रकार बांधवांसाठी लवकरच भव्य आणि सुसज्ज पत्रकार भवन उभारणार हा आत्मविश्वास आम्हा सर्व पत्रकार बांधवांमध्ये निर्माण झाला आहे.

- संजय मोहिते (उपाध्यक्ष, रायगड प्रेस क्लब)

Post a Comment

Previous Post Next Post