लाईट ऑफ लाईफ ट्रस्टचा युवा महोत्सव पुंडीर बिझनेस स्कूल येथे साजरा

 


कर्जत / प्रतिनिधी :- लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट संस्थेच्या आनंदो प्लस प्रकल्पच्या माध्यमातून कर्जत - खालापूर तालुक्यातील संस्थेच्या लाभार्थी विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी रुजविण्याच्या अनुषंगाने तसेच त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी "युवा महोत्सव" या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये फोटोग्राफी, ब्लॉग लेखन, वादविवाद, प्रश्नमंजुषा, डिस्प्ले कॉर्नर आणि समूह नृत्य स्पर्धांचे आयोजन पुंडीर बिझनेस स्कूल दहिवली कर्जत येथे करण्यात आले होते.

संस्थेचे समन्वयक दशरथ देशमुख आणि सहाय्यक समन्वयक पंकज कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली टास्क फोर्स प्रतिनिधी यांनी अतिशय उत्तमरीत्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आनंदो प्लस सहाय्यक मॅनेजर श्रृती मालगुंडकर यांनी संस्थेची कार्य वैशिष्ट्ये समजावून सांगितली. पुंडीर बिझनेस स्कूलच्या संचालक विनिता पुंडीर यांनी आपल्या मनोगतात संस्थेचे कार्य आणि विद्यार्थ्यांच्या यशाची प्रशंसा केली. यासह कार्यक्रमाचे मार्गदर्शक स्वप्निल मोरे यांनी कृषी क्षेत्राचा विकास आणि यामधील करिअरच्या संधी यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

संस्थेचे यशस्वी विद्यार्थी ऍंड. विपुल हिसाळके यांनी स्वतःच्या जीवनातील खडतर प्रवास आणि अशातच लाभलेली संस्थेची साथ या जोरावर मिळविलेले यश ही आपली यशोगाथा सांगत विद्यार्थ्यांना आपल्या ध्येयाकडे झेपावण्यास नवप्रेरणा दिली. कर्जत पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनीषा लटपुटे यांनी आपल्या मनोगतात यशस्वी शैक्षणिक प्रवास मुलांना सांगून त्यांना यशस्वी करियर करण्यासाठी प्रोत्साहित केले. संस्थेच्या 11 वी, 12 वी आणि महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या 124 विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन आपला उस्फुर्त प्रतिसाद दिला. युवा महोत्सवामध्ये घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळविलेल्या स्पर्धंकांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते ट्रॉफी आणि प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी कर्जत विभागातील टास्क फोर्स मेंबर्सने विशेष सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post