स्वातंत्र्य सैनिक दत्तात्रेय पांडुरंग डोंबे विद्यानिकेतनमध्ये रौप्यमहोत्सवी वार्षिक स्नेहसंमेलन

 


कर्जत / प्रतिनिधी :- कर्जत तालुका विद्या प्रसारक मंडळ संचलित स्वातंत्र्य सैनिक दत्तात्रेय पांडुरंग डोंबे विद्यानिकेतनचे रौप्यमहोत्सवी वार्षिक स्नेहसंमेलन 30 डिसेंबर आणि 31 डिसेंबर 2024 रोजी साजरे करण्यात आले. ।या वर्षाची विशेष बाब म्हणजे हे वर्ष रौप्यमहोत्सवी वर्ष होते. या वर्षात 12 महिन्याचे 12 उपक्रम घेण्यात आले. ज्यात विद्यार्थ्यांसाठी आनंद मेळावा, स्वच्छता अभियान, भात लावणी, बालहक्क व न्यायसमुपदेशन, पालकांसाठी पाककृती, माजी शिक्षक - विद्यार्थी हे काही महत्वाचे उपक्रम होते. या वर्षीच्या वार्षिक स्नेहसंमेलनाला 30 डिसेंबर 2024 रोजी संध्याकाळी सुरुवात  झाली. या दिवशी 6 वी ते 10 वीच्या विद्यार्थ्यांनी आपले कलागुण साजरे करण्यात आले. या कार्यक्रमासाठी उदघाट्क आणि प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजसेविका स्मिता शैलेश काळे उपस्थित होते. त्यांनी रांगोळी दालन, विज्ञान दालन आणि कलादालन बघून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. 31 डिसेंबर 2024 रोजी सकाळ सत्रात शिशुवर्ग, बालवर्ग ते 5 वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर केले. या कार्यक्रमाची शोभा पाहुणे प्रवचनकार दिलीप नामजोशी (ज्ञानेश्वर माऊली) यांनी आपल्या प्रवचनातून वाढवली. 

31 डिसेंबर 2024 रोजी संध्याकाळी रौप्यमहोत्सवी कार्यक्रम हा आकर्षणाचा विषय ठरला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार व लोकसेवा प्रतिष्ठान अध्यक्ष दीपक पायगुडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. दिपक पायगुडे यांनी आपल्या भाषणातून पालकांना प्रभावित केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार व कर्जत तालुका विद्याप्रसारक मंडळ अध्यक्ष सुरेश लाड उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉं. नितीन आरेकर यांनी केले. अध्यक्षीय भाषणात सुरेश लाड यांनी पालकांशी संवाद साधला. या कार्यक्रमाची विशेषता म्हणजे कर्जतच्या स्वातंत्र्य सैनिक, प्रतिष्ठित व नामवंत व्यक्ती, कर्जत परिसरातील शाळांचा इतिहास यावर आधारित शॉर्ट फिल्म दाखवली तीच पालकांसाठी आकर्षण ठरली.

या कार्यक्रमासाठी शाळेचे सर्वेसर्वा हेमंत डोंबे, कार्याध्यक्ष मुकुंद मेढी, खजिनदार दिपचंद जैन, शालेय समिती अध्यक्ष माधव भडसावळे, शालेय समिती सदस्या रोहिणीताई जोशी तसेच संस्थेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त सन्मानचिन्ह भेट स्वरूपात देण्यात आली. या कार्यक्रमात आदर्श शिक्षक पुरस्कार जागृती दाभाडे यांना देऊन गौरविण्यात आले. या स्नेहसंमेलनाचे प्रमुख म्हणून विनायक अहिरे यांनी काम बघितले. तर त्यांना मार्गदर्शन मुख्याध्यापिका मीरा कडू, मुख्याध्यापिका माया म्हसे यांनी केले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे योगदान दिले. या कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रीय गीताने करण्यात आली.


Post a Comment

Previous Post Next Post