समर्थ पूनम विजय एलीगार (लाड) सीएची परीक्षा उत्तीर्ण

 


* विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून समर्थच्या पाठीवर कौतुकाची थाप देत अभिनंदन करून पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा

गेवराई / प्रतिनिधी :- द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडियामार्फत घेण्यात येणाऱ्या सनदी लेखापाल अर्थात सीए या परीक्षेचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला असून यामध्ये गेवराई येथील येथे समर्थ विजय एलीगार (लाड) हा विद्यार्थी उत्तीर्ण झाला आहे. या परीक्षेत मिळालेल्या यशाबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. समर्थचे प्राथमिक शिक्षण हे चिंतेश्वर विद्या मंदिर गेवराई येथे झाले, त्यानंतर पुढील शिक्षण सेंट झेवियर्स येथे झाले. मात्र, त्याच्या शैक्षणिक जीवनास कलाटणी ही शारदा विद्या मंदिर येथे मिळाली.

शारदा विद्या मंदिरचे मुख्याध्यापक जगदाळे सर, लुंगारे सर, बोर्डे सर, काकडे सर, लोमटे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ दहावीला बोर्डाच्या परीक्षेत 96 टक्के घेऊन उत्तीर्ण झाला. त्यानंतरच्या महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करण्यासाठी पुणे येथील बीएमसीसी (बृहन महाराष्ट्र काॅलेज ऑफ काॅमर्स) प्रवेश घेऊन अकरावी बारावीचे शिक्षण घेत तिथेही 90 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण होऊन पुढे बी. काॅम. पूर्ण करीत क्लासेस करुन सी. ए. फायनलची परीक्षा नोव्हेंबर महिन्यात दिली व या परीक्षेमध्ये त्यांनी भरघोस असे यश मिळवले. समर्थच्या या शैक्षणिक यशामध्ये सर्वात मोलाचे महत्त्वाचे योगदान त्याची मावशी श्रीदेवी लाड हिचे देखील आहे. वेळोवेळी समर्थचा अभ्यास घेण्याचे काम त्याची मावशी श्रीदेवी यांनी केले आहे. त्याच्यामुळे त्याच्या या यशामध्ये श्रीदेवी लाड यांचा सिंहाचा वाटा आहे. 

या यशाबद्दल समर्थचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित, युवानेते शिवराज पवार, युवानेते रणवीर पंडित, अभिजित जैस्वाल, संजय राठोड, जीवन दाभाडे, महेश दाभाडे, मधुकर घुंबारडे, किरण मदुरे, दत्ता झेंडेकर, साप्ताहिक गेवराई संघर्ष योद्धाचे संपादक अमोल कापसे, माऊली डेंगळे, रणजित जैस्वाल, गोरे आबा, राम अप्पा हादगुले, उमेश हादगुले, महेश सोसे, आनंद नावडे, भिवराज मुळूक, किशोर राऊत, संदीप लगड, दादासाहेब खडके, मगन दायमा, घोटणकर भावजी, अक्षय कुलकर्णी, योगेश कापसे, नाटकर, किरण शेंद्रे, गणेश पंडित, गरकळ सर, आलगुडे सर, अंबादास झेंडेकर, नारायण कनपुरे, उमेश राजुरकर, चकोर मडकर, नारायण झेंडेकर, रुक्मिणी अंबादास झेंडेकर, पूजा देविदास झेंडेकर, राजाभाऊ लाड, सरस्वती लाड, श्रीपाद लाड, सदाशिव लाड, तलवाडा येथील आजी-आजोबा, शंकर लाड, शशिकला लाड, नारायण, औंकार, रुक्मिणी, रेणुका, गौरी लाड, शारदा विद्या मंदिर परिवार व सर्व वर्ग मित्र यांनी अभिनंदन केले. यावेळी त्यांच्या आजी शिलाबाई यलिगार यांच्या डोळ्यातून आनंदाश्रु वाहत होते. मोठे चुलते, चुलती, मोठा भाऊ उमेश, योगेश यांच्यासह नातेवाईकांनी हारतुरे, पुष्पगुच्छ देऊन पेढे भरून त्यांचा सत्कार केला व अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. समर्थच्या या यशाबद्दल साप्ताहिक गेवराई संघर्ष योद्धाच्या वतीने त्याचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

Previous Post Next Post