अकोला जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालय अन्नदान

 


अकोला / प्रतिनिधी :- मानव सेवा फाऊंडेशन सामाजिक व सार्वजनिक मंडळ अकोलाच्या वतीने नोव्हेंबर 2018 पासून ते 25 जानेवारी 2025 पर्यंत कोणत्याही प्रकारचा खंड न पडता महिन्याच्या प्रत्येक शनिवारी सकाळी ठीक 9 वाजता शासकीय स्त्री रुग्णालयात रूग्णांच्या नातेवाईकांना व गरजवंत बंधु-भगिनींना अन्नदान वाटप करण्यात येत असते. त्याचबरोबर नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात रात्री उघड्यावर झोपलेल्या गोरगरिबांना  ब्लँकेट व कान टोपीचे वाटप करण्यात येते आणि दरवर्षी 15 ऑगस्ट व 26 जानेवारीला स्त्री रुग्णालयातील रुग्णांना बिस्किट वाटप करण्यात येते. 

नेहमी ठरल्याप्रमाणे 25 जानेवारी 2025 ला सकाळी ठीक 9 वाजता जिल्हा शासकीय स्त्री रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना व गरजवंताला अन्नदान करण्यात आले. आजचे अन्नदाते योगेश पैठणकर हे होते. या अन्नदान कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंघटित कामगार विभाग अकोलाचे जिल्हा अध्यक्ष अद्वैत प्रभाकर शुक्ला, शिवसेनेच्या उपजिल्हा प्रमुख अकोला पूर्व संगीताताई शुक्ला, अभियंता अविनाश कुंभार, रेणुका कुंभार, राजेश धनगांवकर, विवेक सातपुते, राहूल खंडाळकर, कैलास खरात व सिद्धार्थ इंगळे उपस्थित होते. 

Post a Comment

Previous Post Next Post