खालापूर / प्रतिनिधी :- खालापूर शहराजवळील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वनवे निंबोडे ही शाळा एक आदर्श शाळा असून या शाळेत नियमित विविध शासकीय व देशभक्तीपर कार्यक्रम होत असतात. 12 जानेवारी 2025 रोजी या शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलींनी राजमाता जिजाऊ मॉंसाहेब जयंतीनिमित्त व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त वेशभूषा करून त्यांच्या जीवनाबाबत सविस्तर माहिती आपल्या वकृत्व स्पर्धेतून श्रोत्यांना देवून मंत्रमुग्ध केले.
शाळेतील विद्यार्थिनी जिया मंगेश भउड, प्राप्ती सुनील पारंगे, सिद्धी आदिनाथ मिसाळ, आज्ञा नितीन घोलप, गौरवी संतोष मगर आदींनी महापुरुषांवर मार्गदर्शन केले. जयंतीनिमित्त शाळेचे मुख्याध्यापक व सहशिक्षिका पल्लवी चेऊलकर यांनी मार्गदर्शन करून ही जयंती अत्यंत उत्साहात साजरी केली. या जयंतीनिमित्त शालेय कमिटी व सदस्य यांनी मुख्याध्यापक, शिक्षक व मुलांचे अभिनंदन केले.