* बचत गटाच्या अधिकारी गायकवाड मॅडम यांची धमकी
* ईएमआय न भरल्याने वसुली अधिकाऱ्यांचा गोंधळ
* जीवास बरेवाईट झाल्यास अधिकारी जबाबदार
* 1 कोटी रूपयांच्या मानहानीचा दावा ठोकणार
खोपोली / प्रतिनिधी :- येथील तनवीर महिला बचत गटातील अध्यक्ष यांनी मागील दोन महिन्यापासून आपला बचत गटाचा हफ्ता न भरल्याने आज गुरूवार, 26 डिसेंबर 2024 रोजी बचत गट वसुली अधिकारी व कर्मचारी यांनी अध्यक्ष यांच्या घरी व गल्लीत गोंधळ घालत उद्या बचत गटाचा हफ्ता न भरल्यास पाहून घेवू, असा इशारा दिला आहे.
दरम्यान, आर्थिक अडचणीत असलेल्या महिलेची गल्लीत चारचौघांत इज्जत काढणाऱ्या महिला बचत गटाच्या अधिकाऱ्यांवर रिझर्व बँक ऑफ इंडिया (आरबीआय), मुख्यमंत्री, अर्थमंत्री, महिला व बालकल्याण मंत्री, रायगड जिल्हाधिकारी, रायगड पोलिस अधिक्षक कार्रवाई करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आज आर्थिक अडचणीत असल्याने मी हफ्ता भरू शकत नाही, त्यामुळे बचत गटाचे अधिकारी व कर्मचारी भर रस्त्यात...गल्लीत...बचत गटाच्या मिटींगमध्ये मला अपमानित करीत आहेत. उद्या बचत गटाचा हफ्ता भरला, कर्ज क्लोज (Close) झाले तर बचत गटाचे अधिकारी व कर्मचारी माझी इज्जत परत आणून देणार का? हफ्ता न भरला म्हणून माझी बेइज्जती करणाऱ्या व आज गुरूवार, 26 डिसेंबर 2024 रोजी घरी येवून गोंधळ घालणाऱ्या...पाहून घेण्याची धमकी देणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर आपण 1 कोटी रूपयांचा मानहानीचा दावा ठोकू, असा इशारा फिरोजा पिंजारी यांनी दिला आहे.
त्या पुढे म्हणाल्या की, न्यायालयात माझ्या घरी येवून धमकी देणाऱ्या...माझी बेइज्जती करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांनी कर्ज वसुलीसाठी...हफ्ता नाही भरला...ईएमआय न भरला म्हणून माझी बेइज्जती करण्याचा...मला धमकी देण्याचा... वसुलीसाठी बळजबरी, शिवीगाळ, दमदाटी करण्याचा कोणता अधिकार मिळाला आहे? गल्लीत अथवा बचत गटाच्या मिटींगमध्ये मला अपमानित करण्याचा कोणता परवाना रिझर्व बँक ऑफ इंडिया, आयसीआयसीआय बँक, रायगड जिल्हा बचत गट असोसिएशन, महिला व बालकल्याण विभाग, भारतीय राज्य घटनेने दिला आहे? हे सिध्द करावे आणि जर ते सिध्द करू शकत नसेल...कर्ज वसुलीसाठी रिझर्व बँक ऑफ इंडिया (आरबीआय) व भारतीय राज्य घटनेच्या नियमांची पायमल्ली करीत माझी बेइज्जती केली असेल तर संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी माझी माफी मागावी तसेच 1 कोटी रूपयांच्या मानहानीला सामोरे जावे.
* मला काय शिक्षा देणार गायकवाड मॅडम यांनी जाहीर करावे :-
आपल्या व्यवसायासाठी कर्ज घेतले, यातील काही हफ्ते भरले पण आर्थिक अडचणीत सापडल्याने नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचा हफ्ता भरण्यात आला नाही. तोही हफ्ता भरला जावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या सर्व परिस्थितीत बचत गट वसुली अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून बेइज्जती करण्यात येत आहे. महिला बचत गट अधिकारी गायकवाड मॅडम यांनी उद्या हफ्ता न भरल्यास पाहून घेवू, अशी धमकी दिली आहे. तरी उद्या हफ्ता नाही भरला तर गायकवाड मॅडम काय करणार त्यांनी सांगावे. मला व माझ्या कुटुंबाला तुरूंगात टाकणार का? मला व माझ्या कुटुंबाला जीवे मारणार का? सिबिल खराब करून किंवा फायनान्स क्षेत्रात ब्लॅकलिस्ट (Blacklist) करून मला व माझ्या कुटुंबाला कुठूनच पैसे मिळणार नाहीत, अशी तजवीज करून मला व माझ्या कुटुंबाला बरबाद करणार का? माझा न्यूज पेपरचा (मिडीया) व्यवसाय सुरू होवू नये यासाठी दिल्लीपासून गल्लीपर्यंत बंदोबस्त करणार का? माझ्या नवऱ्याला खोट्या गुन्ह्यात अडकवून तुरूंगात डांबणार का? की माझ्या नवऱ्याची सुपारी देवून त्याला आयुष्यातून संपविणार का? मला व माझ्या कुटुंबाला कर्ज मिळू नये यासाठी पत्र व्यवहार करून आम्हाला आत्महत्या करण्यास मजबूर करणार का? फैजल महिला बचत गटातील सर्व महिला सदस्यांचा सिबिल खराब करून किंवा फायनान्स क्षेत्रात ब्लॅकलिस्ट (Blacklist) करून कुठेही कर्ज मिळणार नाही, असा बंदोबस्त करणार का? नेमके गायकवाड मॅडम व त्यांची टीम काय करणार, हे त्यांनी सांगावे.