खोपोलीतील दुचाकीस्वारांना हेल्मेटचे वाटप

 

* होप फॉर हार्ट फाउंडेशन तर्फे धनश्री डिचोलकरचा पुढाकार

* सुरक्षितपणे वाहन चालवा, हेल्मेट घाला" जीव वाचवा, उपक्रम

खोपोली / खलील सुर्वे :- खोपोली शहरातील 'होप फॉर हार्ट फाउंडेशन' तर्फे धनश्री डिचोलकर यांच्या पुढाकाराने दुचाकीस्वारांना रस्ता सुरक्षा हेल्मेटचे वाटप करण्यात आले. 

होप फॉर हार्ट फाउंडेशन व धनश्री डिचोलकर यांच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक उपक्रम राबविले जात असतात. आपण पाहतो की, जेव्हा दुचाकीचा अपघात होतो तेव्हा बहुतेक विना हेल्मेट दुचाकीस्वारांना आपला जीव गमवावा लागतो. तसेच सर्वच दुचाकीसवार हेल्मेट खरेदी करण्याच्या परिस्थितीत नसतात, आधीच पेट्रोलचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सर्वजण हेल्मेट खरेदी करू शकत नाहीत. होप फॉर हार्ट फाउंडेशन व धनश्री डिचोलकर यांच्या लक्षात हा प्रकार आला व त्याचाच एक भाग म्हणून खोपोली पोलिस स्टेशनसमोर येणाऱ्या-जाणाऱ्या गरजू नागरिकांना रस्ता सुरक्षा हेल्मेट न घालणाऱ्या टू व्हीलर चालकांना होप फॉर हार्ट फाउंडेशनमार्फत धनश्री डिचोलकर यांच्या पुढाकाराने मोफत हेल्मेट वाटप करण्यात आले.  

याप्रसंगी खोपोलीचे पोलिस निरीक्षक शितल राऊत यांच्यासह पोलिस कर्मचारी तसेच युवा सेनेचे रायगड जिल्हा संघटक सिद्धांत शेलार, शिवसेना उपशहर प्रमुख मोहसीन शेख आदी उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post