तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने रिकव्हर करण्यात आले मोबाईल

 


* गणेशपुरी पोलिस ठाणे यांच्याकडून संबधीत तक्रारदार यांना हस्तांतर

मुंबई / नरेश जाधव :- ठाणे ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीतून मिसींग झालेल्या मोबाईल फोन रिकव्हरी करण्याबाबत पोलिस अधीक्षक ठाणे ग्रामीण डॉं. डी. एस. स्वामी, अपर पोलिस अधीक्षक ठाणे ग्रामीण भारत तांगडे तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी गणेशपुरी विभाग राहुल झाल्टे यांनी मार्गदर्शनपर सुचना दिल्या असता प्रभारी अधिकारी गणेशपुरी पोलिस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली पोहवा राजेंद्र शेंडे, पो. अं. रविंद्र शेलार नेमणूक गणेशपुरी पोलिस ठाणे यांचे पथक तयार करण्यात आले. सदर पथकाने प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषण करुन एकूण ९ मोबाईल फोन रिकव्हर करण्यात आले.

गणेशपुरी पोलिस ठाणे यांच्या पथकाने रिकव्हर केलेले एकुण ९ मोबाईल फोन हे प्रभारी अधिकारी, गणेशपुरी पोलिस ठाणे यांच्या हस्ते गणेशपुरी पोलीस ठाणे संदीपान सोनवणे येथे संबधित तक्रारदार यांना हस्तांतर करण्यात आले.

सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक ठाणे ग्रामीण डॉं. डी. एस. स्वामी, अपर पोलिस अधीक्षक ठाणे ग्रामीण भारत तांगडे तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी गणेशपुरी विभाग राहुल झाल्टे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशपुरी पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संदीपान सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पोहवा राजेंद्र शेंडे, पो. अं. रविंद्र शेलार यांनी उल्लेखनिय कामगिरी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post