खोपोली / दिनकर भुजबळ :- महाविद्यालयांचे एकत्रित वार्षिक क्रिडा महोत्सव २०२४-२५ चा शानदार उद्घाटन जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार विजेत्या, आंतरराष्ट्रीय कबड्डी मार्गदर्शन सिमरत गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. आजच्या काळात स्मार्ट टिव्ही, मोबाईल वापरले जातात परंतु आपले ध्येय स्मार्ट ठेवल्यास चांगला खेळाडू घडू शकतो. त्यामुळे चांगला विरंगुळा जोपासा यश नक्कीच मिळेल असे मत प्रमुख उद्घाटक गायकवाड यांनी बोलताना व्यक्त केले आहे. जनता विद्यालयाच्या कै. पंत पाटणकर क्रिडा मैदानावर जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, जनता विदयालय प्राथमिक शाळा, जनता विद्यालय पूर्व प्राथमिक शाळा, बी.एल. पाटील तंत्रनिकेतन, के.एम.सी. कॉलेज, शिशु मंदीर, गगनगिरी इंटरनॅशनल स्कूल आणि विधी महाविद्यालयाचा सर्व एकत्रित वार्षिक क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन संपन्न झाले.
क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन संस्थेचे उपाध्यक्ष अबूबकर जळगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. याप्रसंगी कार्यवाह किशोर पाटील, संचालक दत्ताजीराव मसुरकर, जनता विद्यालय अध्यक्ष कैलास गायकवाड, पूर्व प्राथमिक शाळा अध्यक्ष अनंता हाडप, बी. एल. पाटील तंत्रनिकेतन अध्यक्ष जितेश ठक्कर, प्राचार्य प्रशांत माने, छत्रपती विद्यालय अध्यक्ष भास्कर लांडगे, शिशु मंदिर अध्यक्ष विजय चुरी, मुख्याध्यापिका जान्सी आँगस्टीन, मुख्याध्यापिका समिक्षा ढोके, विधी महाविद्यालय अध्यक्ष नरेंद्र शहा, प्राचार्या वर्षा घारे, माजी नगरसेविका केविना गायकवाड, सेवानिवृत्त क्रिडा शिक्षक पद्माकर गायकवाड यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, क्रिडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सोहळ्यावेळी सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी अनेक प्रात्यक्षिके दाखवून उपस्थित पाहुण्यांची मने जिंकली. लहानपणापासून मैदानी खेळ खेळलेलो असतो त्यामुळे आपल्या आयुष्यात खेळाला काय महत्व आहे हे माहिती आहेच. खेळाला फक्त करियर म्हणून बघू नका तर आरोग्य आणि व्यक्तिमत्व विकासासाठी योग्य आहार, झोप घ्या, असे कानमंत्र अंतराष्ट्रीय कबड्डी मार्गदर्शन सिमरत गायकवाड यांनी दिले. संस्थेने ६० ते ६५ वर्षाच्या काळात अनेक खेळाडू निर्माण केले आहेत. शाळांमधील स्पर्धांमधून तालुका, जिल्हा, राज्य, देशपातळीवर विद्यार्थी कसे पोहचतील यासाठी क्रिडा शिक्षक मेहनत घेत असल्याचे संस्थेचे कार्यवाह किशोर पाटील यांनी सांगत आपल्या संस्थेत शिकलेले पद्माकर गायकवाड क्रिडा शिक्षक झाले आणि अनेक विद्यार्थी घडविल्याचे त्यांनी सांगितले.
