ईडीच्या नावाने येणा-या बनावट नोटीसपासून सावधान - अॅड. चैतन्य भंडारी

धुळे / जगदीश का. काशिकर :- सध्या सायबर गुन्हेगारांनी ईडी आणि इन्कम टॅक्सच्या बनावट नोटीसीच्या नावाने मध्यमवर्गियांची फसवणूक करण्याचा एक नविन फंडा शोधला जात आहे. ज्यात सायबर गुन्हेगार नागरीकांना असे भासवतात की, तुमच्या क्रेडीट आणि डेबीट कार्डवरुन २० ते ३० लाखापर्यंतचे संशयास्पद व्यवहार झालेले दिसत आहेत. म्हणून आम्ही तुम्हाला ईडी डिपार्टमेंटतर्फे नोटीस पाठवलेली आहे. तुम्ही सदर नोटीसीप्रमाणे आम्हास आपल्याला ताबडतोब अटक करावी लागेल आणि जर अटक टाळावयाची असेल तर तुम्हाला आम्हाला २० ते ३० लाखापर्यंतचे संशयास्पद व्यवहाराची १० टक्के रक्कम ईडी डिपार्टमेंटला अदा करावी लागेल. जेणेकरुन तुमची आणि तुमच्या परिवाराची समाजात बदनामी होणार नाही व कुठल्याही प्रकारची पेपरबाजी व सोशल मिडीयात तुमची बदनामी होणार नाही. 

अशा फसव्या ईडी किंवा इन्कम टॅक्सच्या नावाने येणा-या नोटीस, फोन कॉल किंवा ई-मेलला नागरीकांनी बळी पडू नये, कारण कुठलाही ईडी डिपार्टमेंटच्या अधिकारी सामान्य नागरीकांना बनावट कॉल करीत नाही किंवा बनावट नोटीस पाठवित नाही. हे फक्त सामान्य नागरीकांच्या मनात ईडी आणि इन्कम टॅक्सच्या नावाने भिती निर्माण करुन नागरीकांची आर्थिक फसवणूक करण्याचा एक नविन फंडा सायबर गुन्हेगारांनी शोधून काढला आहे. तरी नागरीकांनी याबाबत सावधानता बाळगावी व आपल्यासोबत असे गुन्हे झाले असल्यास टोल फ्री नंबर १९३० वर संपर्क साधावे, असे आवाहन अॅड. चैतन्य भंडारी यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post