'लाईट ऑफ लाईफ'च्या विद्यार्थ्यांना छोटीसी आशा संस्थेच्या सहकार्याने वस्तूंचे वाटप


कर्जत / मानसी कांबळे :- रविवार, 1 डिसेंबर 2024 रोजी 'लाईट ऑफ लाईफ' ट्रस्टच्या कर्जत विभागातील आनंदो आणि आनंदो प्लस प्रकल्पच्या 420 विद्यार्थ्यांना 'छोटीसी आशा' या संस्थेच्या पुढाकाराने विद्यार्थ्यांना त्यांनी इच्छा व्यक्त केलेल्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने सायकल, क्रिकेट किट, तबला सेट, ढोलकी, गिटार, स्मार्ट वॉच, शिलाई मशीन अशा विविध वस्तूंचा समावेश होता.

वस्तुस्थिती अशी आहे की, दुर्लक्षित मुलांच्या इच्छा पूर्ण झाल्यानंतर ते सर्वोत्कृष्ट कामागिरी करतात आणि ते मोठे स्वप्न पाहण्याचे धाडस करू शकतात याच विचाराने छोटीशी आशा या संस्थेच्या संस्थापिका मिमी मॅडम यांच्या माध्यमातून आणि 'लाईट ऑफ लाईफ'च्या संस्थापिका डॉं. विली मॅडम यांच्या प्रेरणेने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  

कर्जतमधील 'लाईट ऑफ लाईफ' संस्थेच्या 420 विद्यार्थ्यांना सायकल, गिटार, तबला सेट, स्मार्ट घड्याळ, शिलाई मशीन आणि क्रिकेट किटसह शुभेच्छा भेटवस्तू मिळाल्या. अनंत प्रकल्पच्या विद्यार्थ्यांनी 'दिल है छोटासा...छोटीसी आशा, हे गाणे गाऊन नृत्य सादर केले. या कार्यक्रमात छोटीसी आशा संस्थेच्या सीमा मॅडम आणि त्यांचे सहकारी सहभागी झाले होते. 'लाईट ऑफ लाईफ' संस्थेच्या सिनियर व्यवस्थापक सेजल मॅडम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.


Post a Comment

Previous Post Next Post