नागरिकांनी खोपोली नगर परिषदेला सहकार्य करावे!

 


* खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉं. पंकज पाटील यांचे आवाहन 

खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली नगर परिषदेने माझी वसुंधरा 4.0, स्वच्छ सर्वेक्षण, ओडीएफ (ODF) मध्ये सहभाग नोंदविला होता, त्यामध्ये नगर परिषदेने विभाग स्तरावर दुसरा क्रमांक व राज्य स्तरावर तेवीसावा क्रमांक मिळविला असून रक्कम 50 लाख रूपयांचे बक्षीस प्राप्त केले आहे. 


खोपोली नगर परिषदेचे माझी वसुंधरा 5.0 मध्ये गुणांकन कसे वाढविता येईल, याकरीता खोपोली नगरपरिषदेस कोकण विभागीय आयुक्त डॉं. राजेश देशमुख, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे तसेच कोकण विभाग उपायुक्त गणेश शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ सर्वेक्षण कोकण विभाग तांत्रिक सल्लागार निनाद भागवत यांनी दिनांक 12 डिसेंबर व 13 डिसेंबर 2024 या दिवशी प्रत्यक्ष भेट देवून खोपोली नगर परिषद हद्दीतील प्रत्यक्ष सर्वेक्षण करून खोपोली नगर परिषद गुणांकन वाढविण्यासाठी कोणत्या घटकांची अंमलबजावणी केल्यास विभाग स्तरावर तसेच राज्यस्तरावर माझी वसुंधरा 5.0, स्वच्छ सर्वेक्षण, ओडीएफमध्ये नगर परिषदेचा प्रथम क्रमांक कसा येईल यासाठी मार्गदर्शन केले.

त्या अनुषंगाने खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉं. पंकज पाटील यांनी नगर परिषदेचे अधिकारी, कर्मचारी यांना माझी वसुंधरा 5.0, स्वच्छ सर्वेक्षण, ओडीएफ अंतर्गत मार्गदर्शक सुचना केल्या. नविन हरितक्षेत्र निर्माण करणे, कचऱ्याचे 4 प्रकारात विलगीकरण करणे, मिया वॉकी फॉरेस्ट प्लान्टेशन करणे, नविन सायकल ट्रॅक निर्माण करणे, जलाशयांचे पुर्नवसन करणे, शहरात सोलर प्लॅन उभारून एलईडी लाईट लावणे, पाण्याच्या बचतीसाठी ठिबक सिंचन राबविणे, शहरात चौक सुशोभिकरण करणे...दरम्यान, या अनुषंगाने नागरिकांनी खोपोली नगर परिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी डॉं. पंकज पाटील यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post