शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या शेवगाव तालुका शाखेच्या वतीने आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी शब्दगंधचे संस्थापक सचिव सुनील गोसावी, खजिनदार भगवान राऊत, कार्याध्यक्ष प्रा. डॉं. अशोक कानडे, उपाध्यक्ष शाहीर भारत गाडेकर, ज्येष्ठ साहित्यिक विठ्ठल सोनवणे, नवजीवन प्रतिष्ठानचे संस्थापक राजेंद्र पवार व कॉ. संजय नांगरे आदी उपस्थित होते.
शेवगाव तालुका शाखेचे अध्यक्ष हरिभाऊ नजन यांनी गेल्या दोन वर्षातील विविध कार्यक्रमाचा आढावा सादर केला. या दोन वर्षात काव्य संमेलन, पुस्तकावर चर्चा व पुस्तक प्रकाशन यासारखे उपक्रम राबवल्याची माहिती दिली. यावेळी वैभव रोडी, आत्माराम शेवाळे, विजय हुसळे, विश्वास गाडे, संतोष दहीवळ, प्रा. बाबासाहेब फलके, सुरेश पाटील, उमेश घेवरीकर यांनी शब्दगंधच्या वतीने नवीन लोकांना सहभागी करून घेण्यासाठीच्या विविध उपाययोजनांवर चर्चा केली. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात काव्य संमेलन आयोजित करण्याबाबत चर्चा केली.
यावेळी अध्यक्ष राजेंद्र उदागे पुढे बोलतांना म्हणाले की, शब्दगंधच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहभागी होता यावे यासाठी वार्षिक सभासदत्व योजना सुरू करण्यात येत आहे, लवकरच याचा शुभारंभ शेवगावपासून करण्यात येईल. यावेळी झालेल्या चर्चेत कॉं. संजय नांगरे, भगवान राऊत, प्रा. डॉं. अशोक कानडे, राजेंद्र पवार, विठ्ठल सोनवणे यांनी सहभाग घेतला. संतोष दहिवळ यांनी साहित्यिक उपक्रमाबद्दल चर्चा केली. उपस्थित मान्यवरांचा शाल, पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. बैठकीच्या शेवटी विठ्ठल सोनवणे यांनी आभार मानले.