कर्जत तालुक्यात पशुगणनेचा शुभारंभ

 


कर्जत / नरेश जाधव :- २१ वी पशुगणना ही कर्जत तालुक्यात सुरु झालेली आहे. नुकतेच पंचायत समिती कर्जत येथे पशुगणना २०२४ करीता निवडलेले प्रगणक यांचे प्रशिक्षण हे पंचायत समिती कार्यालय येथे।गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये पशुधन विकास अधिकारी डॉं. मिलिंद जाधव व गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी पशुगणनेसाठी निवडलेल्या प्रगणक यांना सविस्तर मार्गदर्शन केले. या पशुगणना ही कर्जत तालुक्यातील सर्व गावे, गावाअंतर्गत वाडी, वस्ती, पाडे तसेच सर्व शहरी वॉर्डमध्ये एकूण २० प्रगणक यांच्या मार्फत होणार आहे. ही पशुगणना ही अँड्रॉइड मोबाईल अँपद्वारे प्रगणक यांच्याद्वारे घरोघरी जावून होणार आहे.

ह्यामध्ये प्रगणक हे पशुधन जसे गाई, म्हैशी, शेळ्या, मेंढ्या, हत्ती, घोडे, वराह, कुक्कुट पक्षी व इतर यांची प्रजाती, जात, लिंग, संख्या व उपयोगानुसार संबंधित माहिती ही संकलित करून मोबाइल अँपमध्ये भरणार आहेत. जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉं. सचिन देशपांडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉं. शामराव कदम व सहा. आयुक्त डॉं. गिरीश बारडकर यांच्या मार्गदर्शाखाली कर्जत तालुक्यात पशुगणना होत आहे. २१ वी पशुगणना ही २५ नोव्हेंबर २०२४ ते २८ फेब्रुवारी २०२५ ह्या कालावधीत होणार आहे.

घरोघरी, गोठ्यात, हाऊसिंग सोसायटीला भेट देणाऱ्या प्रगणक यांना पशुगणना संबंधित सर्व आवश्यक माहिती द्यावी, त्यांना सहकार्य करावे, असे आवाहन गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांनी नागरिकांना केलेले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post