* यंदा ट्रकवाला कर्जत-खालापूरचा आमदार होणार!
कर्जत / नरेश जाधव :- कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक ही चुरशी ठरली असून अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. त्यामध्ये महायुतीचे उमेदवार आमदार महेंद्र थोरवे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांची निशाणी धनुष्यबाण तर अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांची निशाणी ट्रक आहे.
विधानसभा निवडणुकीचा ज्वर आता हळूहळू चढू लागला आहे. 4 नोव्हेंबर रोजी माघारीची मुदत संपल्यानंतर सर्व उमेदवारांना निशाणीचे वाटप करण्यात आले आहे. आ. महेंद्र थोरवे धनुष्यबाण या निशाणीवर लढत आहेत तर सुधाकर यादवराव घारे या अपक्ष उमेदवाराला ट्रक ही निशाणी मिळाली आहे. तरी कर्जत-खालापूर मतदार संघातील अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी जास्तीत जास्त मतांनी नागरिकांनी आपल्याला निवडून द्यावे, असे आवाहन केले आहे.
जनतेच्या मनातील आपणच आमदार असून जनतेने आपल्याला निवडून दिल्यास कर्जत-खालापूर मतदार संघात मी विकासगंगा आणेल. चहा विक्रेते नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तर रिक्षा चालक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आहेत. मला ट्रक निशाणी मिळाली असून यंदा कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघात मीच आमदार होईल, अशी प्रतिक्रिया अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केली.
जनतेला चांगले माहित आहे की मीच खरा आमदारकीचा दावेदार आहे. कुणी कितीही वल्गना केल्या तरी जनता सुधाकर यादवराव घारे म्हणजेच मलाच यंदा आमदार करतील, अशी मला अपेक्षा आहे असे अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी सांगितले. कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघात मला कुणाचेच आव्हान नसून मीच आमदार म्हणून निवडून येईल यात शंका नाही तरी कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघातील नागरिकांनी ट्रक निशाणीचे बटण दाबून मला मोठ्या मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांनी केले आहे.