मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खाजगी बसची ट्रकला धडक

 

* अपघातात 8 जण जखमी तर 18 जण किरकोळ जखमी 

खोपोली / खलील सुर्वे :- मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे वर शनिवार दि. 9 नोव्हेंबर रोजी पहाटे 5 वाजेच्या सुमारास नवीन बोगद्यामध्ये किमी 39 येथे 38 प्रवाशांनी भरलेल्या खाजगी बसने रस्त्याच्या बाजूला उभ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने अपघात झाला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात 8 जण गंभीर जखमी तर 18 जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

कोल्हापूरहुन मुंबईकडे जाणारी बाळूमामा कंपनीची खाजगी बस (क्र. MH03 DV2412) वरील चालक बालाजी बळीराम सूर्यवंशी (वय 41 वर्ष) (रा. खराबवाडी पो. वायगाव, ता. अहमदपूर, जि. लातूर) बसने समोरील ट्रक (क्र. KA56 5675) वरील चालक महेश भिम रेड्डी मुसाने (वय 31) (रा. गडीगोंडगाव ता. बसव कल्याण, जि. बिदर - कर्नाटक) याने त्याच्या ट्रकच्या ब्रेकची हवा उतरल्याने ट्रक रस्त्याच्या बाजूला अर्थात तिसऱ्या लेनवर उभा केला असताना बस चालकाने अचानक ट्रक समोर पहिल्यास नियंत्रण सुटून ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. या बसमध्ये एकूण 38 प्रवासी होते, त्यातील 8 प्रवासी गंभीर जखमी झाले असून 18 प्रवासी  किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातातील गंभीर व किरकोळ झालेल्या सर्व प्रवाशांना लोकमान्य हॉस्पिटल स्वामिनी ॲम्बुलन्स सेवेच्या माध्यमातून एमजीएम हॉस्पिटल कामोठे येथे उपचारार्थ रवाना करण्यात आले आहे. 

 * गंभीर जखमी

1) मनीषा भोसले

2) सुनिता तराळ 

3) बालाजी बळीराम सूर्यवंशी (चालक)

4) संकेत सत्तपा घारे (सहचालक)

5) अभिजित दिंडे 

6) सरिता शिंदे

7) संदीप मोगे

8) सोनाक्षी कांबळे

* किरकोळ जखमी

1) सना बडसरिया 

2) शिवांश

3) तनिष्का

4) हर्ष  

5) अद्विका 

6) गरिमा पाठक 

7) प्राची 

8) श्रेया

 9) समीक्षा 

10) साक्षी रेपे

11) मानसी लाड

12) जोहा  अन्सारी

13) अमित शहा 

14) दीक्षा 

15) चेतन भोपळे 

16) माही 

17) शौर्य 

18) आदिल 

या अपघातातील बस व ट्रक ही दोन्ही वाहने आयआरबीकडील हायड्राच्या व पुलरच्या सहाय्याने बाजूला घेऊन तिन्ही लेनवरील वाहतूक सुरळीत चालू करण्यात आली आहे. या अपघातात बसमध्ये  अडकलेल्या प्रवाशांना आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, डेल्टा फोर्स आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी बाहेर काढले. महामार्ग वाहतूक पोलिस केंद्र बोरघाट आणि खोपोली पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी तातडीने पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मदत कार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post