५८ व्या राज्य जिमनास्टिक्स अजिंक्यपद स्पर्धेत प्रबोधनकार क्रीडा संकुलाच्या खेळाडूंचा दबदबा

 


मुंबई / प्रतिनिधी :- नुकत्याच औरंगाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय जिमनॅस्टिक्स स्पर्धेत मुंबई संघातून विलेपार्ल्याच्या प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलातील सुमारे मुलींच्या गटातून १२ पैकी ९ तर मुलांच्या गटातून १२ पैकी ८ खेळाडूंचा समावेश होता. 


या स्पर्धेत प्रबोधनकार क्रीडा संकुलाच्या खेळाडूंनी सुमारे १६ पदके जिंकण्याचा विक्रम केला. तर मुलींच्या गटात अनुष्का पाटील, हृतिका प्रभूदेसाई, नीती दोषी तर मुलांच्या गटात मन कोठारी, निशांत करंदीकर, सार्थक रावल यांनी डिसेंबरदरम्यान गुजरात येथे होणाऱ्या आगामी राष्ट्रीय स्पर्धेकरीता आपली जागा निश्चित केली आहे. प्रबोधनकार क्रीडा संकुलाचे प्रशिक्षक शुभम गिरी, विशाल कटकदौंड, वंदिता रावल यांचे ही संकुलाचे अध्यक्ष अरविद र. प्रभू, सचिव मोहन अ. राणे व समस्त विश्वस्त यांनी कौतुक केले.

Post a Comment

Previous Post Next Post