कर्जत / प्रतिनिधी :- आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्व व कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत ग्रुप ग्रामपंचायत ओलमणमधील राष्ट्रवादी अजित पवार गटामधील माजी सरपंच उत्तम विठ्ठल हुमने व गणेश भिका ढोले यांनी शत्रुघ्न शिंगोल व सुरेश अगिवळे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार, दि. ५ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता शिवतीर्थ पोसरी कर्जत येथे शिवसेना पक्षात प्रवेश केला.
या पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी उपसभापती मनोहर थोरवे, अभिजीत शिंगोले, प्रकाश शिगोले, वसंत पारधी , काशिनाथ झूगरे, जैतू मेंगाळ तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.