* मुस्लिम समाजाच्या विकासाला आ. महेंद्र थोरवे यांनीच चालना दिली - मुस्कान सैय्यद
खोपोली / प्रतिनिधी :- आ. महेंद्र थोरवे यांनी खोपोलीसह कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघातील मुस्लिम समाजाच्या विकासाला चालना दिली आहे, त्यामुळे मतदार संघातील मुस्लिम समाज हा आ. महेंद्र थोरवे यांच्या पाठीशी उभा राहिल, असा विश्वास शिवसैनिक तथा युवा नेता मुस्कान सैय्यद यांनी व्यक्त केला.
त्या पुढे म्हणाल्या की, मागील पाच वर्षात आ. महेंद्र थोरवे यांनी जवळजवळ 2900 कोटी रूपयांचा निधी मतदार संघात आणला. जाती-धर्माचा विचार न करता माझा मतदार... भारतीय नागरिक असा विचार करीत सर्वांचा विकास केला. ऐवढेच नव्हे तर हाळ खुर्द गावातील 100 वर्ष जुन्या उर्दू शाळेची मोडकळीस आलेली इमारत आ. थोरवे यांच्या प्रयत्नाने बनत आहे. मुस्लिम कब्रस्तानाला देखील आमदार थोरवे यांनी लाखो रूपयांचा निधी दिला आहे. आज मुस्लिम गावातील रस्ते आमदार साहेबांमुळे दर्जेदार झाले आहेत. लाडकी बहिण योजनेत मुस्लिम बहिणींना देखील मदत मिळाली आहे, त्यामुळे मतदार संघातील मुस्लिम समाज हा आ. महेंद्र थोरवे यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिल, असा विश्वास शिवसैनिक तथा युवा नेता मुस्कान सैय्यद यांनी व्यक्त केला.
विरोधक विकासावर बोलत नाहीत फक्त मुस्लिम समाजात चुकीचा भ्रम पसरवत आहेत. पण मुस्लिम समाज हुशार आहे...कौन खरंच काम करतो आणि कौन आपला वापर करून घेतो हे चांगल्या पध्दतीने माहित आहे. आता मुस्लिम मतदार खोट्या भुलथापांना बळी पडणार नाही आणि विकासपुरूष आ. महेंद्र थोरवे यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभा राहिल. आ. महेंद्र थोरवे पुन्हा आमदार म्हणून निवडून येतील आणि कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघात विकासगंगा वाहतच राहिल, असा विश्वास ही शिवसैनिक तथा युवा नेता मुस्कान सैय्यद यांनी व्यक्त केला.