विरेश्वर वरची खोपोली संघ खालापूर क्रिकेट चषकाचा मानकरी

* खालापूर तालुका भाजपा प्रभारी मंडल अध्यक्ष सनी यादव यांच्या संकल्पनेतून क्रिकेट स्पर्धेचे नियोजन

खालापूर / प्रतिनिधी :- भारतीय जनता पक्ष खालापूर मंडल व भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा खालापूर यांच्या वतीने खालापूर धाकटी पंढरी साजगाव मंदिर येथे क्रिकेट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. खालापूर तालुक्यातील युवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रभारी मंडल अध्यक्ष सनी यादव यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चाच्या वतीने खालापूर क्रिकेट महोत्सव 2025 संपन्न झाले. या क्रीडा व कला महोत्सवाच्या माध्यमातून खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा संकल्प केला गेला आहे. 7 एप्रिल ते 10 एप्रिल दरम्यान दिवसरात्रं क्रिकेट स्पर्धा खेळविण्यात आल्या. खालापूरमधील एकूण 40 संघांनी यामध्ये सहभाग नोंदविला होता.

पनवेल मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना टी-शर्ट देण्यात आले तर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे यांच्याकडून एक ते पाच क्रमांकाला आकर्षक चषक देण्यात आले. या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष नागेश पाटील, युवा मोर्चा कर्जत विधानसभा संयोजक प्रसाद पाटील, मयुर पाटील, प्रसाद देशमुख, विशाल लोते, अभिषेक कदम, महेश कडू, प्रणेश देशमुख, नयन पाटील, दत्ताराम पाटील, विकास मोरे, जयेंद्र पाटील, अनिकेत साळुंखे, स्वप्नील फराट, ज्ञानेश्वर पारंगे, अरुण घोंगे, आकाश मुसळे, मनिष पाटील, तेजस घारे, अक्षय जाधव, सचिन डोखले, राहुल कडव यांनी परिश्रम घेतले. 

या स्पर्धेत प्रथम क्रमांक विरेश्वर वरची खोपोली संघाला प्रथम पारितोषिक रोख रक्कम एक लाख व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. तर परिधी इलेव्हन साईबाबानगरला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक रोख रक्कम पन्नास हजार व आकर्षक चषक. तृतीय क्रमांक अन्वी शिवश्री होराळे संघाला रोख रक्कम तीस हजार व आकर्षक चषक. बापूजी चिलठण संघ चतुर्थ व जय हनुमान संघ सारसन संघ पाचवा यांना अनुक्रमे रोख रक्कम पंचवीस हजार व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेतील 'मॅन ऑफ द मॅच'चा पुरस्कार जय हनुमान सारसन संघाच्या रोहित जाधव यास देण्यात आला. उत्कृष्ट फलंदाज चिलठण संघाचा भावेश गायकर तर उत्कृष्ट गोलंदाज साईबाबा नगर संघाचा सुशांत मोरे व स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक वरची खोपोली संघाचा अक्षय सकपाळ ठरला.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, खालापूर तालुका सरचिटणीस रविंद्र पाटील, चिटणीस विकास रसाळ, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष जगदीश आगिवले, खालापूर तालुका वाहतूक सेल अध्यक्ष हरीभाऊ जाधव, मुनीर धनसे, लव्हेश कर्णूक आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post