* मजारवर फुलांची चादर चढवून केली प्रार्थना
* शाल घालून मुस्लिम बांधवांनी केले घारेंचे स्वागत
* शेकडों मुस्लिम बांधवांसह कार्यकर्त्यांची उपस्थिती
खालापूर / प्रतिनिधी :- कर्जत-खालापूर परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सुधाकर घारे यांनी हाळ खुर्द गावातील शेकडो मुस्लिम बांधवांसोबत हाजी अब्दुल लतीफशाह बाबांच्या दर्ग्यांवर हजेरी दिली. जियारत (दर्शन) करीत नारळ फोडून, मजारवर फुलांची चादर चढवून दुवा केली. दुवानंतर नियाज वाटप करण्यात आले. यावेळी शेकडोंच्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. आम्ही आपल्यासोबत आहोत प्रचंड मताने आपण निवडून येणार...सर्व मुस्लिम समाज खंबीरपणे आपल्यासोबत आहोत, असा विश्वास मुस्लिम बांधवानी दाखवित शाल घालून स्वागत करण्यात आले.
कर्जत-खालापूर परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सुधाकर घारे यांना मुस्लिम समाज, स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांचा जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. "परिवर्तनाची लढाई, आपण जिंकणारच" या घोषवाक्यासह सुधाकर घारे यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. कर्जत आणि खालापूर परिसरात परिवर्तन घडविण्यासाठी त्यांनी अनेक समाजोपयोगी कार्ये केली असून त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकास प्रकल्प मार्गी लागले आहेत. कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी यंदा सुधाकर घारे यांना जिंकवून आणायचे, असा निर्धार मुस्लिम बांधव व कार्यकर्त्यांनी केला आहे.
यावेळी परिवर्तन विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुधाकर घारे, शेखर पिंगळे, रोहिदास पिंगळे, सुभाष गायकवाड, इब्राहिम कर्जीकर, शेख मोहम्मद कर्जीकर, धर्मेंद्र क्षीरसागर,हयात कर्जीकर, शमा कर्जीकर, मुजफ्फर कर्जीकर, इरफान कर्जीकर, हसन जलगांवकर, हनिफ कर्जीकर, अमीन कर्जीकर, हसन कर्जीकर, अब्बास कर्जीकर, फैज कर्जीकर, अजीम कर्जीकर, शमशुद्दीन कर्जीकर, रफिक कर्जीकर, रज्जाक जलगांवकर, सलीम जलगांवकर, समीर सय्यद, मोहम्मद कर्जीकर, फरहान कर्जीकर, रशीद कर्जीकर यांसह प्रचंड कार्यकर्ते उपस्थित होते.