पालीमध्ये समन्वय समितीची बैठक!

 

* सुधागड तालुका समन्वय समितीच्या बैठकीत नगरपंचायत, महावितरणाच्या भोंगळ कारभाराकडे वेधले लक्ष 

सुधागड / निवास सोनावळे :- सुधागड तालुका समन्वय समितीची बैठक बुधवार, दि. २५ सप्टेंबर २०२४ रोजी तहसील कार्यालयातील हिरकणी कक्षेत पार पडली. या वेळी समन्वय अध्यक्ष अनुपम कुलकर्णी यांनी नगर पंचायतीच्या भोंगळ कारभारावर ताशेरे ओढले. नगर पंचायतमध्ये बायोमेट्रिक यंत्रणा लावलेली नाही. मुख्य कार्यकारी अधिकारी नगर पंचायत मॅडम पाच समन्वय समितीच्या सभेला हजर राहिल्या नाहीत याबाबत सविस्तर तक्रार कलेक्टरकडे करणार असे त्यांनी म्हटले. 

कचरा, गटारी तुंबणे, उघडा डबिंग ग्राउंड यामुळे रोगराई विषय महत्त्वाचा आहे तरीसुद्धा नगर पंचायत अधिकारी दुर्लक्ष करतात. भाविकांची व्यवस्था करता येत नाही. फक्त रस्ते बनविणे आणि पैसे खाणे याबाबत नगर पंचायत इंजिनिअर यांना जाब विचारले असता कुठल्याही प्रश्नाचे उत्तर देता आले नाही. यामुळे समन्वय अध्यक्षांनी इंजिनीयरला चांगलेच खडसावले. मॅडमचा रिपोर्ट कलेक्टरकडे करून नगर पंचायतीच्या कामाबाबत चौकशी लावतो. तसेच महावितरणाच्या भोंगळ कारभाराबाबत वेळोवेळी लाईट जाणे, दोन ते तीन तास लाईट न येणे, नवीन मीटरबाबत जीआर प्रमाणे पैसे न घेता जास्त पैसे घेणे, रस्त्याला अडथळे येणारे पोल तत्काळ बाजूला करावे, वेळोवेळी सांगून सुद्धा दुर्लक्ष केले जाते. महावितरणमधील जो नवीन अधिकारी आला आहे तो ग्राहकांना किंमत देत नाही. याबाबत उपस्थित महावितरण बोर्डाचे इंजिनिअर मौर्य यांना जबाब विचारण्यात आले. व्यवस्थित सेवा न दिल्यास सविस्तर तपशील वरिष्ठांकडे पाठवून चौकशी केली जाईल. तसेच अधिकारी ग्राहकांना उलट उत्तर देत असेल त्याला धडा शिकवायला वेळ लागणार नाही असे या बैठकीत अध्यक्षांनी सुनावले. तसेच गटशिक्षणाधिकारी सुधागड पाली यांनाही शिक्षण विभागाबाबत शिक्षक व शाळांबाबत जाब विचारण्यात आला. खडसांबळे शाळेचा शिक्षक शाळेत मुलांना शिकवायला वेळेवर जातो का? तसेच उसर शाळेमध्ये शिक्षक महिन्याच्या 30 दिवस जातो का याबाबत तुमच्याकडे रजिस्टर नोंद आहे का? या बाबत प्रश्नांचा भडीमार केल्याने उत्तर देणे अवघड झाले. तसेच ग्रामसेवक, तलाठी वेळेवर आपल्या ड्युटीवर जातात का? जात नसल्याने तासन्तास ग्राहक यांना ऑफिस जवळ थांबावे लागते याबाबत पंचायत समिती तसेच तहसील कार्यालयाने याची दखल घेऊन ग्राहकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. यावेळी बैठकीला उपस्थित पाली पोलीस सहाय्यक सूर्यवंशी यांनाही अध्यक्ष यांच्याकडून ट्रिपल सीट तसेच गाडी चालविणे याबाबत आदिवासी समाजात सभा घेऊन जनजागृती करावी. जेणेकरून अपघात होणार नाही व आदिवासी यांची जीवितहानी होणार नाही याकडे लक्ष  द्यावे तसेच बाजारपेठेत नगरपंचायतीने 'नो पार्किंग'चे बोर्ड लावले असताना सुद्धा दुचाकीवाले तसेच चार चाकीवाले रस्त्याच्या बाजूला गाड्या लावतात तसेच 'नो एन्ट्री'तून येतात त्यामुळे ट्राफिक जाम होते याकडे लक्ष केंद्रित करावे. याबाबत सूर्यवंशी यांनी सांगितले ठीक आहे आपण सांगितलेल्या प्रमाणे या गोष्टीकडे लक्ष केंद्रित नक्कीच करू. 

अशाप्रकारे विभाग, वनविभाग, बँक विभाग, महावितरण, नगरपंचायत तसेच इतर शासकीय खाते अधिकारी या सभेला उपस्थित असल्याने सर्वांना प्रत्येक क्षेत्रातील कामाबाबत धारेवर धरले गेले. अशाप्रकारे समन्वय समितीत सवाल-जबाबाची खडे जंगी झाली. यावेळी सभेला उपस्थित समन्वय समिती अध्यक्ष अनुपम कुलकर्णी, समन्वय कमिटी, पाली तहसीलदार उत्तम कुंभार, नायब तहसीलदार अडसुळे, निवासी तहसीलदार फुलपगारे यांच्या उपस्थितीत सर्व क्षेत्रातील शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत समन्वय समितीची सभा पार पडली.

Post a Comment

Previous Post Next Post