वर्धा / रुपेश संत :- १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान स्वभाव स्वच्छता व संस्कार स्वच्छता या मोहिमेंतर्गत वर्धा येथे बजाज चौकात प्लास्टिक निर्मुलनाची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
या दरम्यान नवज्योत महिला शैक्षणिक, सामाजिक विकास संस्थेच्या वतीने चौकातील कचरा व प्लास्टिक गोळा करून त्याचे निर्मुलनाचे कार्य करण्यात आले तसेच विविध घोषवाक्य व पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. या प्रसंगी संस्था अध्यक्षा स्मिताताई नगराळे, संस्थेचे कार्यकर्ते रुपेशना महेश कर, भारती सुटे, शिल्पा वानखडे, भाविका भोंगाडे, भारती मारतोडे, गीता तिवारी, अर्चना नगराळे, सिद्धार्थ मेश्राम, दीप नगराळे, विशाल लामसोंगे तसेच इतर वर्धामधील नागरिकांनी मदत केली व स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबविण्यात आले.