* कर्जत विधानसभा क्षेत्रातील 28 शाळांमध्ये साहित्य प्रदान
कर्जत / विलास श्रीखंडे :- महाराष्ट्र राज्यातील कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम 2024-25 अंतर्गत रायगड जिल्हातील 242 शाळांना Digital E-Learning Equipment शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येणार आहे. त्यामध्ये कर्जत विधानसभा क्षेत्रातील 28 शाळांमध्ये आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे डिजिटल ई लर्निंग शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
गुरुवार, दि. 26 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता कर्जतमधील अभिनव ज्ञान मंदिर शाळेच्या सभागृहात कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते कर्जत विधानसभा क्षेत्रातील 28 शाळांसाठी ई लर्निंग साहित्यांचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस दिपक बेहेरे, चिटणीस रमेश मुंढे, किसान मोर्चाचे सुनिल गोगटे, तालुकाध्यक्ष राजेश भगत, अभिनव ज्ञान मंदिर संस्थेचे अध्यक्ष गणेश वैद्य, सचिव नंदकुमार मनेर, शालेय समिती अध्यक्ष विनायक चितळे, शारदा मंदिरचे अध्यक्ष दिनानाथ पुराणीक, अभिनव ज्ञान मंदिर प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक डी. एस.शिंदे, उपमुख्याध्यापिका दाभाडे मॅडम यांसह विविध शाळेतील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.