खोपोली / मानसी कांबळे :- खोपोली शहरातील सुभाषनगर येथील डॉं. बाबासाहेब आंबेडकर संस्कार केंद्र येथे अंत्यत उत्साहात आणि शिस्तबद्धपणे 18 सप्टेंबर 2024 रोजी वर्षावास पौर्णिमेचे आयोजन करण्यात आले होते. वर्षावास म्हणजेच पुरामुळे बौद्ध भिक्खू वाहून जात आणि त्यांच्या चालण्याने शेतातील पिकांचे नुकसान होत त्यांनी हे तथागतांना सांगितले, बुद्धांनी आदेश दिला की आषाढ पौर्णिमेपासून ते अश्विनी पौर्णिमेपर्यंत सर्व भिक्षूंनी एकाच ठिकाणी रहावे, भिक्षेसाठी गावात जावू नये. एकाच ठिकाणी राहून धम्माचे पठण अध्ययन करावे. तेव्हापासून आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा हा काळ वर्षावास म्हणून साजरा केला जातो.
या कार्यक्रमास आरपीआय अध्यक्ष तथा रायगड जिल्हा भारतीय बौध्द महासभा अध्यक्ष अशोक गोतारणे, आरपीआय जिल्हा उपाध्यक्ष गोपीनाथ सोनावणे, रायगड जिल्हा संस्कार प्रमुख के. जी. खंडागळे, रायगड जिल्हा प्रवक्ते आर. एस. गायकवाड, रायगड जिल्हा संस्कार सचिव व्ही. जी. जाधव, तालुका सचिव राहुल गायकवाड, प्रवचनकार दगडू जाधव, तालुका अध्यक्ष रोहन मोरे, महिला रायगड जिल्हा अध्यक्षा सुरेखा पवार, सदस्या अरुणा पवार, खालापूर तालुका शहर अध्यक्ष संजय ओव्हाळ, आरपीआय अध्यक्ष सुभाषनगर ग्राम शाखा दिपक गायकवाड, महिला आरपीआय अध्यक्षा ग्राम शाखा सुभाषनगर प्रमिला कदम, शशिकांत सोनावणे, शैलेश ओव्हाळ, रविंद्र पगारे, संतोष आ. गायकवाड, यश गायकवाड, गणेश गायकवाड, सनी गायकवाड, मनिषा कांबळे, अश्विनी गायकवाड, उज्ज्वला गायकवाड, मायावती गायकवाड, गिता कांबळे, शांता कवडे, गिता मर्चंडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी आरपीआय अध्यक्ष ग्रामशाखा सुभाषनगर दिपक गायकवाड, महिला आरपीआय अध्यक्षा ग्रामशाखा सुभाषनगर प्रमिला कदम, तालुका सचिव राहुल गायकवाड, रायगड जिल्हा प्रवक्ते आर. एस. गायकवाड, भारतीय बौध्द महासभा ग्रामशाखा सुभाषनगर अध्यक्ष संतोष गायकवाड, महिला अध्यक्ष जयश्री गायकवाड, महिला सचिव मानसी कांबळे, खजिनदार गिता कांबळे आदींनी परिश्रम घेतले.

.jpg)
