शिक्षकांचा राज्यव्यापी आक्रोश महामोर्चा

* सुधागड तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळा उद्या बंद

सुधागड / निवास सोनावळे :- स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील विद्यार्थी यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे आणि शिक्षकांच्या प्रलंबित मागण्याची शासनाने सोडवणूक करावी, या करीता महाराष्ट्र राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटना यांनी उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे.

या मोर्चात सहभागी होण्यासाठी सुधागड तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षक उद्या एक दिवस सामूहिक रजेवर राहत असल्यामुळे सर्व शाळा बंद राहण्याची शक्यता आहे. सुधागड तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षक उद्या या मोर्चात सहभागी होत असल्यामुळे शाळा बंद राहतील शाळा आणि विद्यार्थी यांच्या भवितव्यासाठी हे आंदोलन असून आम्हाला सर्व पालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सुधागड तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनेच्या पदाधिकारी यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post