* खालापुरात सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली भव्यदिव्य प्रवेश सोहळा
खोपोली / प्रतिनिधी :- विधानसभा निवडणूक महिन्याभरावर येवून ठेपली आहे. दरम्यान, कर्जत-खालापूर मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची तयारी करीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधाकर घारे यांनी भव्यदिव्य पक्ष प्रवेश सोहळा घेतला. खालापूर तालुक्यातील तब्बल 11 गावांमधील 1200 हून अधिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेत सुधाकर घारे यांना पाठिंबा जाहीर दिला.
महड फाट्यावरील युकेज रिसॉर्टमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सर्वसाधारण सभा आज आयोजित करण्यात आली होती. यावेळी सरचिटणीस दत्ताजी मसुरकर, प्रदेश सरचिटणीस अशोक भोपतराव, भरत भगत, उल्हास भुर्के, भगवान भोईर, शरद कदम, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड, युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे, महिला जिल्हाध्यक्षा उमा मुंडे, तालुका प्रमुख संतोष बैलमारे, विधानसभा अध्यक्षा सुरेखा खेडकर, जिल्हा उपाध्यक्षा शिल्पा सुर्वे, तालुका कार्याध्यक्ष भूषण पाटील, खोपोली शहराध्यक्ष मनेश यादव, कमाल पाटील, रमेश जाधव, शहर अध्यक्षा वैशाली जाधव, महिला तालुका अध्यक्षा प्राची पाटील आदी उपस्थित होते
या सभेत ढोलताशांचा गजर करीत आणि राष्ट्रवादीचे झेंडे खांद्यावर घेत शिवसेनेचे नावंडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रोहिदास पिंगळे, माडपचे मनसेचे नेतृत्व सतीष घोडविंदे यांच्यासह बाराशेहून अधिक कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना कर्जत-खालापूरमधील हुकूमशाही, दादागिरी घालवून या मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे, असे आवाहन सुधाकर घारे यांनी उपस्थितांना केले. यावेळी दत्तात्रेय मसुरकर, अशोक भोपतराव, भरत भगत, उमा मुंडे, संतोष बैलमारे, अंकीत साखरे यांनी मार्गदर्शन केले.