खालापुरात धनगर समाजाचा रास्ता रोको आंदोलन

 

* धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करा

* सकल धनगर समाज खालापूरची मागणी

खालापूर / प्रतिनिधी :- धनगर समाजाला (एसटी सर्टिफिकेट) आरक्षण मिळावे यासाठी आज सकल धनगर समाज खालापूर आणि हर   हर चांगभले, धनगर चांगभले, धनगर समाज खालापूर यांच्या वतीने पालीफाटा येथे रास्ता रोको आंदोलन करुन तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. 

गेल्या अनेक वर्षांपासून धनगर आरक्षणाची अंमलबजावणी करावी, यासाठी गेल्या 60 वर्षांपासून  आंदोलन करीत आहेत. मात्र कोणत्याच सरकारने याकडे लक्ष दिले नसल्याने समाज बांधवांच्या वतीने गेल्या अनेक दिवसांपासून पंढरपूर येथे आमरण उपोषण चालू आहे. याकडे सरकारने दुर्लक्ष केले असून सरकारला धनगर समाजाची ताकद दाखवायची वेळ आली असून या सकल धनगर समाज खालापूर आणि हर हर चांगभले धनगर समाज खालापूर यांच्या वतीने पाली फाटा येथे भव्य रास्ता आंदोलन करून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी मठाधीपती महंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी आश्रम, उपसभापती अण्णासाहेब बाचकर महाराज, ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे कोकण संपर्क प्रमुख रामचंद्र पुकळे, खालापूर तालूका धनगर समाज अध्यक्ष हरेश ढेबे, ऑल इंडिया धनगर समाज महासंघाचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य संतोष घाटे, रासपा कोकण प्रदेश अध्यक्ष भगवान ढेबे, रासपा रायगड जिल्हाध्यक्ष संपत ढेबे, ऑल इंडिया धनगर समाज रायगड जिल्हा उपाध्यक्ष सुनील कोकळे, क्षत्रिय धनगर समाज कर्जत तालूका अध्यक्ष अक्षय चोपडे, ऋषिकेश वाघमोडे, जानू आखाडे, ऑल शिरवली ग्रामपंचायत उपसरपंच विजय ढेबे, आनंद ढेबे, चंद्रकांत हिरवे, प्राध्यापक दशरथ देवकाते, माजी ग्रामपंचायत सदस्य बबन हिरवे, दत्ता हिरवे, ज्ञानेश्वर शिंगाडे, बाळू बोडेकर, संतोष शेडगे, सुरेश शेडगे, रामा खरात आदींसह अनेक समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post