* उपजिल्हाप्रमुख नितिन सावंत : मतदार संघातील जनतेला सर्वज्ञात ठाकरे गटाला आरोप करण्याची गरज नाही
कर्जत / प्रतिनिधी :- नेरळ येथील घटनेप्रकरणी आ. महेंद्र थोरवे यांनी ठाकरे गटावर बदनामी करीत असल्याचा आरोप केला आहे. पण मतदार संघातील जनतेला सर्वज्ञात आहे, त्यामुळे ठाकरे गटाला आरोप करण्याची गरज नाही अशी प्रतिक्रिया शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड उपजिल्हाप्रमुख नितिन सावंत यांनी व्यक्त केली.
सावंत पुढे म्हणाले की, मारहाण प्रकरणातील आरोपी हा आमदार थोरवे यांचा पगारी कार्यकर्ता असून त्याच्यावर नेरळ, कर्जत, खालापूर, खोपोली पोलिस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, या प्रकरणी ठाकरे गटाकडून रायगड पोलिस अधिक्षक यांना निवेदन देण्यात येईल, असे सांगतानाच आगामी दोन महिन्यात निवडणूक होणार असून विधानसभा मतदार संघातील जनता मतपेटीतून गुंडशाही मोडून काढेल, असा इशारा ही शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड उपजिल्हाप्रमुख नितिन सावंत यांनी दिला.