डॉं. शेखर जांभळे यांचा आम आदमी पार्टीच्या रायगड जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा

* स्व. आनंद दिघे यांना गुरुस्थानी मानून काम करणारे डॉं. जांभळे लवकरच करणार नव्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात

* आमदारकी लढण्याचा मोह न बाळगणारे खोपोलीचे नगराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार डॉं. जांभळे यांच्या निर्णयाने तालुक्यात उलथापालथ

खोपोली / प्रतिनिधी :- आम आदमी पार्टीला रायगड जिल्ह्यात खऱ्या अर्थाने वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे डॉं. शेखर अलका तुळशीदास जांभळे यांनी आपला जिल्हाध्यक्ष व प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

सामाजिक कार्यात विक्रमवीर म्हणून ओळखले जाणारे रायगड भुषण डॉं. शेखर जांभळे यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला व आम आदमी पार्टीत प्रवेश केला. 15 मार्च 2023 रोजी त्यांनी तालुकाध्यक्ष म्हणून पदभार स्विकारला व अल्पावधीतच त्यांनी केलेल्या कामाची पावती म्हणुन रायगड जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. पक्षाचे विविध कार्यक्रम राबवून त्यांनी झपाट्याने पक्ष विस्तार केला. लोकसभा निवडणूकीत ते आघाडीचे स्टार प्रचारक होते. त्यांच्या कल्पक नेतृत्वाखाली आमरण उपोषण, 3 बेमुदत उपोषण याने ते तालुक्यातील उपोषणकार म्हणून सर्वांना परिचित आहेत. प्रसिद्ध अशा ताकई साजगाव रोडसाठी भर दिवाळीत केलेले 13 दिवसीय बेमुदत उपोषण व पुन्हा मार्च महिन्यातील केलेले बेमुदत 11 दिवसीय उपोषण हे त्यांच्यातील जिद्द व संयमाची ग्वाही देते. साजगाव ताकई रोडचे प्रश्न सुटत नाही असे लक्षात आल्यावर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मागण्या मान्य न झाल्यावर नगरपालिकेसमोर त्यांनी केलेले भजन आंदोलन व उपोषणातील दोन गाढवांचा वापर  हे ऐतिहासिक ठरलेले आहे. त्यांनी सुरू केलेल्या डॉं. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोरील झाडाखाली शिबिराला जनतेचा प्रचंड प्रतिसाद लाभला. जनतेला आपल्या शहरात सहज उपलब्ध होवून आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी हक्काचा माणूस मिळाला. जनसामान्यांचे प्रश्न समजून घेवून त्यांना साथ देणारा नेता म्हणून ते अल्पावधीत संपूर्ण पंचक्रोशीत प्रसिद्ध झालेले आहेत.

15 मार्च 2023 पासून ते एप्रिल 2024 पर्यंत सकाळी 9 ते 10 वाजेपर्यंत असणाऱ्या या शिबिराची जागतिक विक्रम म्हणून नोंद झालेली आहे. स्व.आनंद दिघे यांना गुरुस्थानी मानणारे डॉं. शेखर जांभळे हे रोज जनतेला दिवसातून सहज लाभणारा नेता म्हणून जनमानसात प्रसिद्ध आहे. कामाची कल्पकता, विनम्र, प्रसंगी बिनधास्तपणा, माणसे जोडण्याची कला, दूरदृष्टी, चाणक्य नीती यांनी ते अल्पावधीत राजकारणात देखील प्रसिद्ध झाले. भल्या भल्या नेत्यांना अनेक वर्ष जे प्रसिद्धीचे ग्लॅमर मिळत नाही ते त्यांना अल्प कालावधीत लाभले. आपच्या वतीने ते आमदारकीचे दावेदार होते. परंतु तालुक्यातील प्रचंड सामाजिक कार्यामुळे खुप मोठा वर्ग डॉं. शेखर जांभळे यांच्यामागे कायम उभा असतो. त्यांच्या कामावर मनापासून प्रेम करणारे त्यांचे कट्टर समर्थक व साथीदार यांनी डॉं. शेखर जांभळे यांनी नगराध्यक्ष व्हावे अशी इच्छा व्यक्त केलेली आहे, त्यातूनच विचारमंथनातून पक्ष सोडण्याची तयारी देखील करावी असे सुचविल्याचे सूत्रांकडून कळते.


डॉं. शेखर जांभळे यांनी आम आदमी पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष अजित फाटके पाटील यांना राजीनामा पाठवून दिलेला आहे. लवकरच ते आपल्या नवीन राजकीय पर्वाची सुरुवात करतील. सामाजिक कार्य व राजकीय कामात कुठेही एकत्रीकरण न करणारे डॉं. शेखर जांभळे यांचे सर्व पक्षात व जनमानसात आगळे वेगळे स्थान आहे. गेल्या दोन महिन्यात खोपोली शहरात त्यांनी व त्यांच्या समविचारी सहकारी मित्रांनी स्थापन केलेल्या खोपोली खालापूर संघर्ष समितीस तालुक्यामध्ये सर्वसामान्य जनता एकत्र आल्यास काय करू शकते याचे सातत्यपूर्ण काम करून वादळ उठवले आहे आणि नक्कीच खोपोलीकरांच्या व स्वत:च्या नावलौकिकात भर पडेल असा राजकीय निर्णय डॉं. शेखर जांभळे घेतील यात शंकाच नाही. डॉं. जांभळे हे खोपोलीकरांचे भविष्यात नगराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार असून त्यांच्या नवीन पक्षप्रवेशाने खोपोलींना ऐतिहासिक नगराध्यक्ष मिळेल यात काही शंकाच नाही असे सर्वत्र बोलले जाते. 

दूरदृष्टीपणा, प्रचंड मेहनती, व्यथा समजून घेणारा नेता व स्वतःच्या गावासाठी करावयाची प्रचंड आस्था त्यांना शांत बसू देत नाही हे सर्वांना माहीत आहे. लहानात लहान, गरिबात गरीब, मोठ्यात मोठा या सर्वांना आपले वाटणारे डॉं. शेखर जांभळे नक्कीच या शहराचे नगराध्यक्ष पद मिळवुन त्याला मानाचा दर्जा देतील याबाबतीत कुठेही शंका नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे. ते ज्या राजकीय पक्षात प्रवेश करतील त्या पक्षाला त्यांच्या 24 वर्षीय सामाजिक कार्याचा व अविस्मरणीय राजकीय कारकीर्दीचा नक्कीच फायदा होईल असे मानले जाते. समाजातील त्यांना मानणारा वर्ग हा नक्कीच कायम डॉं. शेखर जांभळे यांच्यासोबत राहील.

Post a Comment

Previous Post Next Post