* नसरापूर ग्रामपंचायत हद्दीतील साळवड येथे सापडले बेवारस महिलेचे मृतदेह
कर्जत / नरेश जाधव :- कर्जत तालुक्यातील नसरापूर ग्रामपंचायत हद्दीत मौजे साळवड येथे एका महिलेचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा मृतदेह एका झाडाला हिरव्या कलरची ओढणीने लटकलेल्या अवस्थेत असल्याचे प्रत्यक्षदर्शी दिसून येत असल्याचे पहावयास मिळत आहे. या महिलेचा मृतदेह हा पंजाबी ड्रेसमध्ये असून हातात लाल कलरच्या बांगड्या, अंदाजे वय ३५ च्या आसपास असल्याचे दिसून येत आहे. हे प्रेत ओढणीच्या साहाय्याने झाडाला लटकत्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मृतदेहाच्या चेहऱ्यावर एसिड अथवा केमिकल टाकून चेहऱ्याची ओळख पटू नये म्हणून खबरदारी घेतली की काय ? असे असल्याचा संशय देखील येथे निर्माण होत असून पोलिस तपासाअंती आणि फॉरेन्सिक लॅबच्या रिपोर्टमध्ये हे स्पष्ट होईलच. जणू काही ही हत्या आहे आत्महत्या अशी शंका देखील नागरिकांमधून उपस्थित केली जात आहे. अशा अवस्थेतील मृतदेह हा चार ते पाच दिवस आधीचेच असलेले मृतदेह पाहिल्यास दिसत आहे. तर येथून रस्त्याच्या बाजूने जाणाऱ्या एका ग्रामस्थ यांच्या हे निदर्शनास आल्याने त्यांनी स्थानिक पोलिस पाटील यांना कळविताच पोलिस पाटील यांनी कर्जत पोलिस ठाण्यात खबर देताच कर्जत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी सुरू केली आहे.
कर्जत पोलिसांना समोर हे एक मोठे आवाहन असून तर तालुक्यात गेल्या वर्षभरापासून यासारख्या अनेक घटना वारंवार घडत असून कर्जत पोलिस या गुन्ह्याचा कश्या प्रकारे तपास करतात याकडे समस्त कर्जतकरांचे लक्ष लागून राहिले आहे. घडलेल्या घटनेबाबत शवविच्छेदनानंतर अधिक माहिती समोर येईलच. तसेच ही हत्या आहे की आत्महत्या ? याचा देखील कर्जत पोलिस शोध लावतीलच. कर्जत पोलिस यांनी कर्जत तालुक्यातील घडत असलेल्या अनेक गुन्ह्याचा तपास हा जलदगतीने तपास करून घडलेल्या गुन्ह्याचा शोध लावून त्यांच्यावर कायद्यांतर्गत कारवाई देखील करण्यात आली असल्याचे पहायला मिळाले आहे. तर घडलेल्या घटनेनंतर मात्र कर्जत तालुक्यासह परिसरात एकच खळबळ उडाली असून याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. या घटनेचा तपास कर्जत पोलिस ठाण्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी डी. डी. टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या उपस्थितीत पोलिस उपनिरिक्षक संगीता गावडे, पोलिस उपनिरीक्षक सतीश शिंदे यांसह पोलिस हवालदार काठे, पोलिस हवालदार वडपे, पोलिस नाईक नागरगोजे, पोलिस शिपाई पाटील हे करीत आहेत.