अ. नगर / प्रतिनिधी :- साहित्य समाजाला आरसा दाखविण्याचे काम करत असून साहित्यिकांना प्रेरणा आणि प्रोत्साहन देण्याचे काम महाराष्ट्र साहित्य परिषद करत आहे, ही अतिशय कौतुकाची बाब असून सातत्याने असे उपक्रम राबवायला हवेत, असे मत पद्मश्री पोपटराव पवार यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद अहमदनगर शाखेच्या वतीने माजी आमदार स्वर्गीय राजीव राजळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार वितरण समारंभ त्यांच्या शुभहस्ते पार पडला, यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मसापच्या प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार या होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून आमदार मोनिकाताई राजळे, आमदार सचिन तांबे, आमदार संग्रामभैय्या जगताप, विभागीय कार्यवाह जयंत येलुलकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्व साहित्यिकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी यांच्या आठवणींचा डोह या साहित्यकृतीस मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मसापचे अध्यक्ष किशोर मरकड, कार्याध्यक्ष प्रा. डॉं. चं. वि. जोशी, उपाध्यक्ष दशरथ खोसे, राज्य कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत पालवे, शिल्पा रसाळ, डॉं. श्याम शिंदे, शितल म्हस्के, प्रा. मेधाताई काळे, नसीर शेख, शिवाजी साबळे, ज्ञानदेव पांडुळे, राजेंद्र चोभे, अरविंद ब्राह्मणे, यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमास शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, प्रा. डॉं. अशोक कानडे, भारत गाडेकर, मारुती सावंत, शाहीर अरुण आहेर, शर्मिला गोसावी, सुरेखा घोलप, राजेंद्र फंड, वर्षा भोईटे, शर्मिला रणधीर, बबनराव गिरी, बापूसाहेब भोसले, पीएन डफळ, प्रा. डॉं. बापू चंदनशिवे, शशिकांत शिंदे, डॉं. रमेश वाघमारे, सुनील गुगळे, उपजिल्हाधिकारी गणेश मरकड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री म्हस्के यांनी केले तर शेवटी दशरथ खोसे यांनी आभार मानले. शाहीर भारत गाडेकर यांच्या पसायदानाने कार्यक्रमाचे समारोप झाला.
