मुंबई / प्रतिनिधी :- बौद्धजन सहकारी संघ (ता. गुहागर, जि. रत्नागिरी) संलग्न संस्कार कमिटी यांच्या विद्यमाने आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत दर रविवारी वर्षावास प्रवचन मालिका २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे. या प्रवचन मालिकेचे आरंभ तथा प्रथम पुष्प कार्याध्यक्ष दीपक मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि. २८ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ४ वाजता बाल क्रीडा मंडळ, डॉं. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, नायगाव, दादर (पूर्व), मुंबई १२ येथे आयोजित करण्यात आले आहे.
या प्रथम पुष्पप्रसंगी प्रवचनकार बौद्धाचार्य सुगंध कदम गुरुजी हे बौद्ध गाथा व त्यांचा मराठी अनुवाद या विषयाने सदर प्रवचन मालिकेचे प्रथम पुष्प गुंफतील. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस संदेश गमरे व चिटणीस सचिन मोहिते हे करणार असून संस्कार कमिटी अध्यक्ष संदीप गमरे हे स्वागताध्यक्ष म्हणून पाहुण्यांचे स्वागत करणार आहेत. तसेच प्रमुख विश्वस्त संजय पवार, विश्वस्त राजाभाऊ तथा रामदास धो. गमरे, मुकुंद पवार, के. सी. जाधव, माजी विश्वस्त एस. बी. जाधव, माजी कार्याध्यक्ष संजय जाधव, माजी अध्यक्ष सिद्धार्थ पवार, माजी सरचिटणीस संजय तांबे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तरी सर्व विभाग अधिकारी, विश्वस्त मंडळ, मध्यवर्ती पदाधिकारी, सर्व उपसमित्या त्यांचे पदाधिकारी, सदस्य, महिला मंडळ, उपासक, उपासिका यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धम्म प्रचार व प्रसार कार्यास सहकार्य करावे, असे आवाहन बौद्धजन सहकारी संघाच्या काढण्यात आलेल्या परिपत्रकात करण्यात आले आहे.