मुंबई / प्रतिनिधी :- कलावंतांचे माहेरघर असणारी सम्यक कोकण कला संस्था (रजि) ही मातृसंस्था कला क्षेत्रासोबतच सामाजिक बांधिलकी जोपासत आली आहे. सध्या ग्लोबल वार्मिंगची परिस्थिती लक्षात घेता संस्थेच्या वतीने आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे अध्यक्ष मंदार कवाडे यांच्या अध्यक्षतेखाली वृक्षारोपण अभियान रविवार, दि. २१ जुलै २०२४ रोजी, सकाळी ११ वाजता वंगणपाडा, पेल्हार, विरार फाटा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
सदर प्रसंगी संस्थेच्या कार्यात सामाजिक कार्यकर्ते किशोर विनोद भड व समाजसेविका मिना किशोर भड यांचा विशेष सहभाग लाभला तसेच अध्यक्ष मंदार कवाडे, सरचिटणीस नरेश शिंदे, कार्याध्यक्ष भगवान साळवी, सहसचिव प्रविण मोहिते, कोषाध्यक्ष सुभाष सावंत, उपाध्यक्ष मुकुंद तांबे, विनोद धोत्रे, जनार्दन काकडे, मोहन थोरात, मीनाक्षी थोरात, वनिता गायकवाड तसेच सर्वच आजी-माजी पदाधिकारी व सभासदांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला व मोठ्या संख्येने वृक्षारोपण करून सदर अभियान यशस्वी केले.
या वृक्षारोपण अभियानास ममता मुकुंद तांबे यांचे विशेष सहकार्य लाभल्याने त्यांचे आभार व्यक्त करून अध्यक्ष मंदार कवाडेंनी कार्यक्रमाची सांगता केली.