शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तालुक्यातून ब्लू बेल्सच्या विद्यार्थांनीच झळकावली आपली गुणवत्ता



नायगाव / शिवाजी पांचाळ तळणीकर :- महाराष्ट्र राज्य प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृती परीक्षा मंडळ पुण्याच्या वतीने नुकतेच फेब्रुवारी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये नायगाव तालुक्यातील ब्लू बेल्सच्याच विद्यार्थ्यांनी आपली गुणवता झळकावून शाळेची मान उंचावली आहे. अशाच पध्दतीचे यश दहावीच्या परीक्षेमध्येही अनेक विद्यार्थांनी आपली गुणवता दाखवून दिली आहे, यावरून कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये ब्लू बेल्सच्या विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सातत्याने कायम ठेवल्यामुळे नांदेड जिल्ह्यात नायगावामध्ये शैक्षणिक गुणवता प्रभावी असल्याचे पालकामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नायगाव तालुक्यामध्ये प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षामध्ये 15 विद्यार्थी शिष्यवृती धारक विद्यार्थी पात्र झाले असून 10 विद्यार्थी हे ब्लू बेल्स या इंग्रजी माध्यम शाळेचे आहेत तर माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये तालूक्यात एकूण 8 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले असून ब्लू बेल्स इंग्रजी माध्यम शाळेचे 5 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. 

या विद्यार्थांना शिवम बावणे, हरीष गायकवाड, नागेश घंटे, जयवंत बेळगे, संगिता गडगेकर, उज्वला भोसले, सविता मालवे, अरूणा दमकोंडवार, लता नायर, गीता पांचाळ आदी शिक्षकांनी प्राथमिक शिष्यवृत्तीसाठी मार्गदर्शन केले तर माध्यमिकसाठी सिद्धार्थ गायकवाड, संभाजी जाधव, दता सुर्यवंशी, लक्ष्मण पाटील, दत्ता कंदुर्के, महेश मुंडकर, दिपाली मलमवार, वर्षा पाटील , सुनंदा मामीडवार, माला यरसनवार आदी शिक्षकांनी मार्गदर्शन केले. यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉं. के. हरीबाबू, उपाध्यक्ष डॉं. शंकर गड्डमवार, मुख्याध्यापिका लक्ष्मी मॅडम, सल्लागार डॉं. साई दीप्ती, गोविंद पवार, सय्यद गौस, दत्ता कंदुर्के, गंगाधर कानगुले यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post