* उपअभियंताच्या डोळ्यांदेखत ठेकेदाराचे थूंक लावून साकावच्या कॉंक्रिटीकरणाचे काम?
कर्जत / प्रतिनिधी :- कर्जत तालुक्यात गेल्या दोन वर्षापासून रायगड जिल्हा परिषद उपविभाग कर्जत उपअभियंता यांनी केलेल्या कर्जत - खालापूर तालुक्यामधील निष्कृष्ट दर्जाच्या बांधकामांच्या कामांची चौकाचौकात चर्चा सुरु आहे. मे महिन्यातील कर्जत तालुक्यात हालिवली येथील कर्जत-कल्याण महामार्गालगत जिल्हा परिषद बांधकाम विभागाने चार लाखांचा खर्च करून साकावचे म्हणजे नाल्यातील सिमेंटचे पाईप टाकून त्यावर अंदाजे तीस ते चालीस फुटाचे रस्त्यावर काँक्रिटीकरणाचे काम करण्यात आले आहे. पावसाळा सुरू होण्याआधी झालेल्या कामाचे मोजमाप देखील घेण्यात आले आहे. मात्र, जून महिन्यात पावसाळा सुरु होताच साकावचा संपूर्ण भाग पाईपापासून खचला असून काँक्रिटीला भले मोठे तडे गेले असून जागोजागी खड्डे पडले आहेत. सिमेंट पाईप लगत काही भागाचा काँक्रीट तुटला व चुरा झाल्याचे चित्र दिसून येत आहे. हे साकाव बांधण्यासाठी अधिकारी व ठेकेदारने कोणत्या दर्जाचा काँक्रीट वापलरला आहे, असा प्रश्न कामाचा दर्जा पाहिल्यावर उपस्थित होत आहे.
हालिवली येथील झालेल्या साकावच्या बांधकाम संदर्भात पत्रकार कर्जत उपअभियंता खिल्लारे यांच्या कार्यालयात माहिती घेण्यासाठी गेले असता उप अभियंता खिल्लारे यांना साकावच्या झालेल्या कामाची माहिती विचारली असला उपअभियंता खिल्लारे यांनी माहिती देतांना सांगितले की, मला झालेल्या कामाची काहीच माहिती नाही आहे. आपण आमचे अधिकारी परब यांच्याकडून माहिती जाणून घ्या. परब यांनी पत्रकारांना माहिती देतांना सांगितले की, पावसाआधी साकावचे दर्जेदार काम करण्यात आले होते. आमच्याकडे काँक्रीटीकरणाचे सर्व टेस्ट रिपोर्ट पण आहेत. पावसात रस्त्याची माती दबते म्हणून खड्डे पडतात आणि आम्ही ड्रॉंईग नुसार हे साकाव बांधले आहे. खड्डे पडले असतील तर आम्ही पाहून घेतो, आम्ही ठेकेदाराचा बिल अदा केलेले नाही. आम्ही पून्हा नवीन बनवून घेतो. तर हे पाईप इतके उंच का ठेवण्यात आले आहेत असा प्रश्न विचारला असतांना उपअभियंता खिल्लारे यांनी सांगितले की, खोदकाम करतांना दगड लागल्यामुळे खोदता आले नसेल त्यामुळे हे साकावचे पाईप उंच राहिले असतील अशी माहिती पत्रकारांना देण्यात आली.
एकीकडे उपअभियंताना हालिवली येथे झालेल्या साकावंच्या कामाची माहिती नसल्याचे ते सांगतात तर दुसरीकडे पाईप टाकताना खाली दगड लागल्यामुळे पाईप उंच ठेवले आहेत अशी माहिती देतात तर दुसरे जुनीअर अभियंता परब म्हणाले की, साकावचे काम दर्जेदार झाले आहे. सर्व काँक्रीटचे क्युब टेस्ट असल्याचे सांगतात तर दुसरीकडे पावसात माती लूज झाल्याने साकावचे काँक्रीट खचून खड्डे पडले असतील, अशी माहिती पत्रकारांना देतात. एक महिन्यात साकावच्या कॉंक्रिटीकरणाची अक्षरशः चालन झाली असून कर्जत -खालापूर तालुक्यात झालेल्या रस्त्यांचे व बांधकामांची अवस्था काय असेल, असा प्रश्न साकावचे काम पाहिल्यावर उपस्थित होत आहे. कधी अंगणवाडी फक्त कागदांवर असून चुकून सही झाल्याचे सांगण्यात येते तर कधी झालेल्या कामांची उपअभियंतांना माहितीच नसल्याचा दिखावा करतात? आधीच महाराष्ट्र राज्यावर कर्जाचा डोंगर असून या अधिकाऱ्यांच्या डोळ्यांदेखत कामे निष्कृष्ट दर्जाची होत असून जनतेच्या पैशाचा चुराडा का केला जात आहे. या भ्रष्टाचाराच्या गंगेत वरिष्ठाचाही सिंहाचा वाटा आहे का? दर्जेदार कामे करण्यासाठी या अधिकाऱ्यांना कोणी बंदी घातली आहे का? या अधिकाऱ्यांना भरमसाठ पगारे मिळत नाहीत का? या कार्यालयात असणाऱ्या या अधिकाऱ्यांनी कोणत्या विद्यापीठातून इंजिनीरिंगचे शिक्षण घेत डिग्री प्राप्त केली आहे, याची चौकशी वरिष्ठ अधिकारी करणार का? काँक्रिटीकरणाचे काम दर्जेदार कसे केले जाते ह्याची माहिती हे अधिकारी जनतेला का देत नाही? या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी न झाल्यास निष्कृष्ट दर्जाचा झालेल्या साकाववर बसून आंदोलन करणार असल्याचा इशारा पत्रकारांनी दिला आहे.