खालापूर / सुधीर माने :- इनरव्हील क्लबची 40 वी डिस्ट्रिक्ट असेम्ब्ली 'स्वर्णप्रभा' 6 व 7 जुलै 2024 रोजी नवीन पनवेल येथील काकाजींनी वाडी येथे संपन्न झाली. असोसिएशनच्या अध्यक्षा सुनीता जैन, डिस्ट्रिक्ट 313 च्या माजी अध्यक्षा रचना मालपाणी तसेच नवनिर्वाचित अध्यक्षा डॉं. शोभना पालेकर व क्लबच्या अन्य पदाधिकारी यांच्या उपस्थितीत ही असेम्ब्ली अतिशय नियोजनबद्ध रीतीने पार पडली. या असेम्ब्लीमध्ये इनरव्हील क्लब खोपोलीला त्यांच्या विविध क्षेत्रातील सामाजिक कामांसाठी जसे हॅप्पी स्कुल, मेडिकल, निसर्ग संवर्धन, स्पेशल चाईल्ड, स्त्रीशक्ती, ब्रँडिंग प्रोजेक्ट या व अशा इतर 10 वेगवेगळ्या थीमच्या प्रोजेक्टसाठी 10 ट्रॉफी व 10 प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
क्लब प्रेसिडेंट श्रीदेवी राव व सेक्रेटरी दीना शाह यांना बेस्ट प्रेसिडेंट व बेस्ट सेक्रेटरीचा द्वितीय पुरस्कार, क्लब ट्रेझरर मधुमिता पाटील यांना बेस्ट ट्रेझररचा द्वितीय पुरस्कार, क्लब आयएसओ रेवती गजेंद्रगडकर यांना बेस्ट आयएसओचा द्वितीय पुरस्कार आणि क्लब एडिटर विनया हर्डीकर यांना बेस्ट एडिटर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच यावेळी खोपोली क्लबने डिस्ट्रिक्ट कॉन्फरन्स 'दिव्या'चे नियोजनबद्ध आयोजन करण्यात प्रमुख व महत्वपूर्ण भूमिका बजाविल्याबद्दल विशेष ट्रॉफी प्रदान करून सन्मानित केले. खोपोली क्लबचे जास्तीत जास्त प्रोजेक्ट असोसिएशन वेबसाईटवर अपलोड करण्यात आल्याबद्दल असोसिएशन तर्फेही विशेष ट्रॉफी देण्यात आली. या कार्यक्रमासाठी डिस्ट्रिक्ट 313 मधील 77 क्लबमधून जवळपास 430 इनरव्हील सदस्या हजर होत्या.